दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४
. श्रावण कृष्ण नवमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज चांगला दिवस आहे" *गोपाळकाला*
नक्षत्र - रोहिणी/ (दुपारी ३.३८ नंतर) मृग. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुध आणि गुरुशी शुभ योग आहे. वक्तृत्व चमकेल. संपत्ती वाढेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. कठोर भूमिका घ्याल. स्पष्ट बोलणे होईल. पशु लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र गुरू आणि चंद्र मंगळ युती आहे. मन समाधानी राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. नेमकी भूमिका घ्याल. दबदबा वाढेल. नोकरीत काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. दानधर्म कराल. वक्तृत्व चमकेल. वादविवादात यश मिळेल. गृहसजवट वर खर्च कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. लाभात चंद्र आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. व्यासायिक कामे मार्गी लागतील. प्रवास घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. नोकरी/ व्यवसायात यश मिळेल. पर्यटनावर खर्च कराल. कोर्ट कामात यश मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. प्रवास घडतील मात्र नियोजन बदलेल. सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. उच्च शिक्षणात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अष्टम चंद्र आहे. जपून पावले टाका. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ मिळतील. श्री. गणेश उपासना लाभदायक ठरेल. संकट टळेल. चैनीवर खर्च कराल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सप्तम स्थानी मंगळ चंद्र युती आहे. शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल. जोडीदार उत्तम सहकार्य करेल. कार्यसिद्धी होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल. व्यवसायातून लाभ होतील. वाहन जपून चालवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम ग्रहमान आहे. व्यावसायिक लाभ होतील. संतती बाबत खुश खबर मिळेल. शेअर्स आणि लॉटरी यातून लाभ होतील. संतती बाबत खुश खबर मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक कामात भाग घ्याल. आनंदी आणि समाधानी वाटेल. मात्र काही घरगुती कटकटीना सामोरे जावे लागू शकते. गोर गरिबांना मदत करा. धर्म कार्य कराल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. कामे पूर्ण करा. हाती घ्याल ते कार्य तडीस न्याल. हातून मोठे कार्य घडेल. पराक्रम गाजवाल. त्याची दखल घेतली जाईल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
Comments
Post a Comment