दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४






. श्रावण कृष्ण द्वादशी. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला  दिवस आहे. सूर्य पूर्वा फाल्गुना नक्षत्रात प्रवेश.


चंद्रनक्षत्र - पुनर्वसू/(संध्याकाळी ५.५६ नंतर) पुष्य.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन/ (सकाळी ११.३४ नंतर) कर्क.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. मन आनंदी राहील. चल संपत्ती वाढेल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. अंतर्मनातून योग्य सल्ला मिळेल. मोठी खरेदी होईल किंवा भेटवस्तू मिळतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) इष्ट देवतेची कृपा होईल. आध्यत्मिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नसली तरी नंतर उत्तम ग्रहमान आहे. त्याचा लाभ घ्या. आरोग्य सुधारेल. मित्रांकडून लाभ होतील. महिलांना दागिने किंवा वस्त्रे मिळतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. जुने शत्रुत्व संपुष्टात येईल.  व्यावसायिक यश लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध खर्चात टाकणारा आहे. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी खर्च कराल. आर्थिक गणिते जुळून येतील. पत्नीसाठी वेळ द्याल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रगतीसाठी उत्तम ग्रहमान आहे. राशीस्वामी शुक्राचा चंद्राशी शुभ योग आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सुरुवात संथ आहे. उत्तरार्ध अनुकल आहे. जमीन व्यवहारातून उत्तम यश मिळेल. शेतीतून उत्पन्न वाढेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. मोठे यश मिळू शकेल. नात्यातून लाभ होतील. उत्तरार्ध मन अस्वस्थ करणारा असू शकतो.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्रगतीची घोडदौड चालू राहणार आहे. व्यावसायिक गणिते जुळून येतील. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पंचम आणि षष्ठ स्थनी चंद्र आहे. प्रापंचिक कामे व्यवस्थित पार पडतील. संततीची नाराजी दूर होईल. अनुकूल शुक्राचा लाभ घ्या. अर्थकारण सुधारेल. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुम्हाला मुळातच सामाजिक कार्याची आवड आहे. आज त्यासाठी तुम्ही अधिक वेळ द्याल. येणी वसूल करावी लागतील. आध्यत्मिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीवर छाप पडेल.

Comments