प्रभाकर शंकर चौगले पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य,ऋषिकेश,शंतनू, दिव्या व दिशा आघाडीवर

 प्रभाकर शंकर चौगले पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य,ऋषिकेश,शंतनू, दिव्या व दिशा आघाडीवर



कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

 चेस असोसिएशन कोल्हापूर च्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (19 वर्षाखालील) मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज प्रारंभ झाल्या.या स्पर्धा प्रभाकर शंकर चौगले यांनी पुरस्कृत केल्या आहेत.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ कृष्ण हवेली मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल भाई शहा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी व मनोबल व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकाशभाई मेहता व धीरज वैद्य यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनिष मारुलकर, आरती मोदी उपस्थित होते.

जयसिंगपूर, इचलकरंजी,वारणानगर,गडहिंग्लज  व स्थानिक कोल्हापूर येथील नामांकित छप्पन बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.यापैकी 24 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. आज झालेल्या मुलांच्या चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित आदित्य सावळकर, द्वितीय मानांकित ऋषिकेश कबनूरकर, आठवा मानांकित शंतनू पाटील हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. तृतीय मानांकित इचलकरंजीचा विवान सोनी, चौथा मानांकित कोल्हापूरचा प्रणव पाटील, पाचवा मनांकित कोल्हापूरचा वरद आठल्ये, सहावा मानांकित अभय भोसले जांभळी, सातवा मानांकित इचलकरंजीचा शौर्य बागडीया, प्रणव मोरे कोल्हापूर, हित बलदवा जयसिंगपूर, आरव पाटील कोल्हापूर व अरिन कुलकर्णी कोल्हापूर  हे नऊ जण तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.

मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील या दोघी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

Comments