बीएसएनएल चे ग्राहक हवालदिल , नंबर पोर्ट केला पण ना नेटवर्क ना स्पीड
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
नुकत्याच खाजगी मोबाईल कंपन्यांनी मोबाईल रिचार्ज मध्ये दरवाढ केली आणि नेमकं याचवेळेला बीएसएनएल ने आपले आकर्षक प्लॅन्स बाजारात आणल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी आपले सध्याचे नंबर बीएसएनएल मध्ये पोर्ट केले परंतु बहुसंख्य ग्राहकांना याचा आता पश्चाताप होत असून नंबर तर पोर्ट केला परंतु बीएसएनएल ला बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नसल्याने ग्राहकांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे
बीएसएनएल चे प्लॅन्स खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत परंतु नेटवर्क स्पीड आणि विस्तृत कव्हरेज च्या कमतरतेमुळे ग्राहकांना मनस्ताप होत असून सोशल मीडियावर मात्र ग्राहक बीएसएनएल ची फिरकी घेत आहेत. एका ग्राहकाने मी दोन दिवस झालं दिड जीबी संपवतोय पण संपतच नाही अशी कमेंट केलीय तर एकाने मी एक रील काल अर्धी पाहिली असून उद्या अर्धी पाहणार असल्याचे सांगितले .
नेटवर्क ला कंटाळून बरेचसे ग्राहक आपल्या आधीच्या नेटवर्क कडे जायचा विचार करत आहेत परंतु ट्राय च्या नियमावलीनुसार एकदा नंबर पोर्ट केल्यानंतर 90 दिवसांपर्यंत पुन्हा पोर्ट करता येत नाही . यामुळे बीएसएनएल ग्राहकांची मात्र गोची झाली आहे . सध्याच्या डिजिटल युगात सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्याने इंटरनेट नसल्याने सर्व कामांचा खोळंबा होत आहे . सर्वच कंपन्यांनी ग्राहकांना चांगले नेटवर्क द्यावे अशी सर्व सामान्य ग्राहकांची भावना आहे
Comments
Post a Comment