परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधींवर शनिवारी माहितीपूर्ण मोफत सेमिनारचे आयोजन

 परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधींवर 

शनिवारी माहितीपूर्ण मोफत सेमिनारचे आयोजन



कोल्हापूर, २५ सिटी न्यूज नेटवर्क 

- परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी स्मार्टच्या वतीने शनिवार, ता. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत हॉटेल रेडिएन्ट, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड येथे परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधींवर माहितीपूर्ण मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे.



सेमिनारमध्ये स्टडी स्मार्टच्या व्यवस्थापकीय संचालकांचा सत्र प्रवेश प्रक्रिया, अभ्यास गणत्वे, अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती आणि निधीबद्दल माहिती देण्यात येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी ज्या ज्या अडचणी येतात त्या या सेमिनाच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत तसेच या सेमिनारमध्ये अर्ज आणि शिष्यवृत्ती कार्यशाळा, विद्यापीठाचा अर्ज आणि शिष्यवृत्ती संधींबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार असून त्याचप्रमाणे प्रमाणित सल्लागारांकडून वैयक्तिक असा सल्ला देण्यात येणार आहे. परदेशात अर्धवेळ नोकऱ्या निवासाबद्दल परदेशात कसे राहावे याबद्दल व्यावहारिक माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यात आयइएलटीएस मास्टरक्लास आयोजित करत आहोत जो मास्टर ट्रेनर द्वारा संचालित केला जाईल. यासह एक आयइएलटीएस मॉक टेस्ट आयोजित करू जी विद्यार्थ्यांना 'आयइएलटीएस परीक्षेचा अनुभव देईल. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोफत या सेमिनारसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान स्टडी स्मार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर चेतन जैन यांनी केले आहे.


Reg Link : https://forms.gle/qc4H8s3oq66LaTXQ6


मोफत नोंदणीसाठी कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा : ८९५६५३७३९८/८९५६१११६५७

Comments