मुस्ताक शेख स्मृती प्रित्यर्थ हिंदुस्तान फूड प्रायोजित कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवान,प्रेम, सिद्धी व आर्या आघाडीवर
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज् चेस क्लब ने आयोजित केलेल्या मुस्ताक शेख स्मृतीप्रित्यर्थ कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात प्रारंभ झाल्या.बालकृष्ण हवेली मंदिरमहावीर गार्डन समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धा हिंदुस्थान फुड्सने प्रायोजित केले आहे.
जयसिंगपूर,इचलकरंजी,शिरोळ,हातकणंगले,वारणानगर,पन्हाळा,गडहिंग्लज,गारगोटी व स्थानिक कोल्हापुरातील 67 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.यापैकी बारा बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहे.
स्पर्धेचे उद्घाटन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राहुल चिकोडे व हिंदुस्थान फूड्स च्या हुस्ना शेख व शबान शेख,उद्योजक भावीन कापडिया यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले मनीष मारूलकर धीरज वैद्य उत्कर्ष लोमटे, अनिश गांधी आरती मोदी अभिजीत चव्हाण,प्रकाश मेहता व अनिल शहा उपस्थित होते.
मुलांच्या गटात स्विस् लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्या होणार आहेत तर मुलींच्या गटात पाच फेऱ्या होणार आहेत.आज झालेल्या मुलांच्या गटात चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी व , पाचवा मानांकित सेनापती कापशीचा प्रेम निचल हे दोघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.द्वितीय मानांकित इचलकरंजीचा शौर्य बगाडिया, चौथा मानांकित कोल्हापूरचा आरव पाटील , व दहावा मानांकित इचलकरंजीचा आराध्य ठाकूर देसाई हे तिघेजण साडेतीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.तृतीय मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर व सहावा मानांकित जयसिंगपूरचा हित बलदवा यांच्यासह एकूण अकरा जण तीन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.
मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे व द्वितीय मानांकित कोल्हापूरची आर्या चोडणकर या दोघी तीन गुणासह संयुक्तपणेे आघाडीवर आहे.तृतीय मानांकित इचलकरंजीची सांची चौधरी व आठवी मानांकित कोल्हापूरची नायरा चौधरी या दोघी दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.
Comments
Post a Comment