राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध


राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध

मालवण २८ सिटी न्यूज नेटवर्क 

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अत्यंत घाई गडबडीने हा पुतळा तयार केला गेला. आठ महिन्यापूर्वी याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. 


या घटनेसाठी महायुतीचे भ्रष्ट सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन करत महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 


कंत्राटदाराचे निकृष्ट काम आणि कामामध्ये झालेला भ्रष्टाचार यामुळेच हा पुतळा कोसळला. स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी हे सरकार या प्रश्नावर राजकारण करू नका असं म्हणतंय. पुतळा पडल्याचे कोणतेही शल्य या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, उलट काहीतरी चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला असं अशास्त्रीय कारण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देत आहेत. त्यामुळं या मुजोर, भ्रष्ट सरकारचा निषेध करत असल्याचं आप चे प्रदेश संघटन सचिव यांनी सांगितलं.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्षा परेश साळवी, कोल्हापूर शहर अध्यक्ष उत्तम पाटील, डॉ. कुमाजी पाटील, अभिजित कांबळे, मिली मेश्राम, दुष्यन्त माने, ओंकार पताडे, राकेश गायकवाड, रवींद्र राऊत, रमेश कोळी, दत्तात्रय बोंगाळे आदी उपस्थित होते.

Comments