मुस्ताक शेख स्मृती हिंदुस्तान फूड्स प्रायोजित कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी व सिद्धी कर्वे अजिंक्य ; आरव पाटील व आर्या चोडणकर उपविजेते
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
- बालकृष्ण हवेली मंदिर,महावीर गार्डन समोर,नागाळा पार्क कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने आयोजित केलेल्या मुस्ताक शेख स्मृती कोल्हापूर जिल्हा अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धा हिंदुस्थान फूड्स ने प्रायोजित केल्या होत्या.मुलांच्या गटात अंतिम सातव्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनी ने इचलकरंजीच्याच आराध्य ठाकूर देसाईचा पराभव करून सात पैकी सात गुण मिळवून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले.दुसऱ्या पटावर कोल्हापूरच्या आरव पाटील ने कोल्हापूरच्या अन्वय भिवरे वर विजय मिळवित सहा गुणासह उपविजेतेपद निश्चित केले. द्वितीय मानांकित इचरकंजीच्या शौर्य बगाडिया ला साडेपाच गुणासह तृतीय स्थान मिळाले. सहावा मानांकित जयसिंगपूरचा चा हित बलदवा व दहावा मानांकित इचलकरंजीचा आराध्य ठाकूर देसाई ने अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळविले.
मुलींच्या गटात अंतिम पाचव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर अग्रमानांकित जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ने इचलकरंजीच्या सांची चौधरीचा पराभव करून पाच पैकी पाच गुण मिळवत अजिंक्य ठरली.दुसऱ्या पटावर द्वितीय मानांकित कोल्हापूरच्या आर्या चोडणकर ने इचलकरंजीच्या धनश्री पोर्लेकर ला हरवून चार गुणासह उपविजेतेपद पटकाविले. इचलकरंजीच्या सांची चौधरी ला तीन गुणासह तृतीय स्थान मिळाले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ धनंजय पाटील पूनम सोनी इंद्रजीत कर्वे व सुप्रिया पोर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर धीरज वैद्य,अनिश गांधी व आरती मोदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कोल्हापूर मधील ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम मध्ये 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील निवडण्यात आलेले बुद्धिबळपटू पुढील प्रमाणे
मुले :- 1) विमान सोनी इचलकरंजी 2) आरव पाटील कोल्हापूर
मुली :- 1) सिद्धी कर्वे जयसिंगपूर 2) आर्या चोडणकर कोल्हापूर
उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) आदिराज डोईजड वारणानगर 2) अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर 3) वृषांक माने कोल्हापूर
सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) अवनीश जीतकर कोल्हापूर 2) ऋतुराज पाटील इचलकरंजी 3) ध्रुव भोसले पन्हाळा
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुली
1) सांची चौधरी इचलकरंजी 2) गार्गी गुरव इचलकरंजी 3) सिद्धी चौगुले अब्दुल लाट
सात वर्षाखालील उत्कृष्ट मुली
1) तनिषा चौगुले कोल्हापूर 2) नायरा शेलार कोल्हापूर
Comments
Post a Comment