ॲडव्होकेट पी.आर.मुंडरगी स्मृती ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम पुरस्कृत* *एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेत नागपूर चा कुशाग्र पलीवाल सांगलीची अनुजा कोळी व अमरावती ची हर्षी गुप्ता आघाडीवर
ॲडव्होकेट पी.आर.मुंडरगी स्मृती ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम पुरस्कृत
एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेत नागपूर चा कुशाग्र पलीवाल सांगलीची अनुजा कोळी व अमरावती ची हर्षी गुप्ता आघाडीवर कोल्हापूरच्या सिद्धी कर्वे कडून अग्रमानांकित मुंबईच्या आद्या पाटील ला पराभवाचा धक्का.
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
- जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्येतेने चेस असोसिएशन कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या ॲडव्होकेट पी.आर.मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या आज दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या सिद्धी कर्वे ने अग्रमानांकित मुंबईच्या आद्या पाटीलला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष अजित ठाणेकर, युवा उद्योजक रौनक शहा, महालक्ष्मी बँकेचे मुख्य शाखाधिकारी प्रशांत पतकी, मंगलधामचे संचालक रामचंद्र टोपकर, महालक्ष्मी बँकेचे संचालक उदय मयेकर, पार्श्वनाथ बँकेचे संचालक विक्रम शहा, जेष्ठ नागरिक सुभाष जोशी व महालक्ष्मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. खरोशी यांच्या उपस्थितीत व यांच्या हस्ते आज झालेल्या मुलांचे व मुलींच्या फेर्यांची सुरवात करण्यात आली.
आज झालेल्या मुलांच्या गटातील ५ व्या फेरीमध्ये पहिल्या पटावर अग्रमानांकित आदित्य जोशी ला १० व्या मानांकित मुंबईच्या अर्जुन सिंग ने बरोबरीत रोखले. दुसऱ्या पटावर ७ वा मानांकित नागपूरच्या कुशाग्र पलीवालने कोल्हापूरच्या ४ था मानांकित विवान सोनी वर विजय मिळवला. तिसऱ्या पटावर द्वितीय मानांकित गौरांग भंडारीने बिगर मानांकित पुण्याच्या नैतिक मानेला पराभूत केले. चौथ्या पटावर २२ व्या मानांकित मुंबईच्या विहान अग्रवाल ने ५ व्या मानांकित पुण्याच्या निर्वाण शहा ला बरोबरीत रोखले. पाचव्या पटावर ९ व्या मानांकित मुंबईच्या रेयांश व्यंकटने १६ व्या मानांकित सांगलीच्या कश्यप खाकरीयावर मात केली.
मुलींच्या गटात ५ व्या फेरीमध्ये पहिल्या पटावर २२ वी मानांकित अमरावतीच्या हर्षी गुप्ता ने तृतीय मानांकित रायगडच्या व्याघा बैजूला पराभवाचा धक्का दिला. दुसऱ्या पटावर २८ वी मानांकित सांगलीच्या अनुजा कोळीने ठाण्याच्या बिगर मानांकित श्रीलक्ष्मी नायरला पराभूत केले. तिसऱ्या पटावर द्वितीय मानांकित सोलापूरच्या सानवी गोरेने अमरावतीच्या जायना नाओले ला पराभूत केले. चौथ्या पटावर ४ थी मानांकित संभाजी नगरच्या भूमीका वागळेने बिगर मानांकित पुण्याच्या प्रांजल राउतला हरविले. पाचव्या पटावर बिगर मानांकित ठाण्याच्या हिया पाटीलने १४ वी मानांकित मुंबईच्या सेरेजो गीझेलला पराभवाचा धक्का दिला.
पाचव्या फेरीअंती ७ वा मानांकित नागपूरचा कुशाग्र पलीवाल ५ गुंणासह आघाडीवर आहे तर अग्रमानांकित पुण्याचा आदित्य जोशी, द्वितीय मानांकित मुंबईचा गौरांग भंडारी, ९ वा मानांकित मुंबईचा रेयांश व्यंकट, १० वा मानांकित मुंबईचा अर्जुन सिंग व ११ वा मानांकित मुंबईचा आदित्य कदम हे पाच जण ४.५ गुणांसह संयुक्त पणे द्वितीय स्थानावर आहेत. तृतीय मानांकित मुंबईचा समविद पासबोला, चौथा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनी, पाचवा मानांकित मुंबईचा निर्वाण शहा, सहावा मानांकित अनय पिंपरकर, तेरावा मानांकित कोल्हापूरचा शौर्य बागडीया, सतरावा मानांकित पुण्याचा कवीश लिमये, अठरावा मानांकित पुण्याचा रुतम मोहगावकर, बाविसावा मानांकित मुंबईचा विहान अग्रवाल, सत्ताविसावा मानांकित पुण्याचा राघव पावडे, आठाविसावा मानांकित मुंबईचा जुयल नोवा, एकोणतिसावा मानांकित ठाण्याचा आराध्य पार्टे व चाळीसावा संभाजी नगरचा श्रेयांश नलवडे हे बारा जण ४ गुणांसह संयुक्त तृतीय स्थानावर आहेत.
मुलींच्या गटात ५ व्या फेरीअंती बाविसावी मानांकित अमरावतीची हर्षी गुप्ता व आठाविसावी मानांकित अनुजा कोळी या दोघी ४.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. द्वितीय मानंकित सोलापूरची सानवी गोरे, तृतीय मानांकित रायगडची व्याघा बैजू, चौथी मानांकित संभाजी नगरची भूमिका वागळे, सव्वीसावी मानांकित ठाण्याची कार्थिक उतारा, सत्ताविसावी मानांकित कोल्हापूरची सिद्धी कर्वे, तेह्तीसावी मानांकित मुंबईचा महुआ देशपांडे व अडतिसावी मानांकित ठाण्याची या सहाजणी ४ गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. तेरावी मानांकित संभाजी नगरची भक्ती गवळी व शेहाचाळीसावी मानांकित ठाण्याची श्रीलक्ष्मी नायर या दोघी ३.५ गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत. पहिल्याच फेरीत मुलींच्या गटात *कोल्हापूरच्या सिद्धी कर्वे अग्रमानांकित मुंबईच्या आध्या पाटीलला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून अंतिम ८ व्या फेरीनंतर बक्षीस समारंभ दुपारी दोन वाजता होणार आहे. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बुद्धिबळातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेत मुंबईचे रघुनंदन गोखले* यांना आमंत्रित केले आहे. त्याचबरोबर उद्योगपती सुबोध गद्रे, उद्योजक अभय देशपांडे, बी न्यूजचे संचालक व युवा उद्योजक पृथ्वीराज महाडिक हे पण उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment