'शहीद' मध्ये गोपाळकाला : मास मीडिया विभागाच्या गोपिकांनी फोडली मानाची दहीहंडी
कोल्हापूर (तिटवे) २७ सिटी न्यूज नेटवर्क
येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी साठी कॉलेज मधील सर्व विभागाच्या विद्यार्थींनींनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला व दहिहंडीचा ऊत्सव साजरा केला.
या बदल अधिक माहिती देताना या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर म्हणाले की, आमच्या महाविद्यालयामध्ये नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते, पण यावेळची ही स्पर्धा वेगळी होती कारण दहीहंडी म्हटलं की मुलांचा खेळ समजला जातो. या परंपरेला छेद देत आमच्या महाविद्यालयातील मुलींनी या दहीहंडीला वेगळीच रंगत आणली होती. ही मानाची दहीहंडी बी. ए. मास मीडिया विभागाच्या विद्यार्थ्यांनींनी फोडली.
या दहीहंडी साठी बीसीए, बीएस्सी आयटी, डीएमएलटी बीएएमएम आणि बीएस्सी मायक्रो या विभागांनी सहभाग घेतला होता. सर्वच टीमने तीन स्तरापर्यत सलामी दिली. आणि दुसऱ्या फेरीत बी. ए.मास मिडिया या विभागाने मानाची दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनींना सामाजिक आणि पारंपरिक सणांचे महत्त्व कळावे म्हणून महाविद्यालयामध्ये सातत्याने असे सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येत असतात.
या कार्यक्रमाचे आयोजन कंप्युटर सायन्स विभाग व एनएसएस विभागाने केले होते. याप्रसंगी प्रा.सागर शेटगे प्रा.दिग्विजय कुंभार, प्रा. अश्विनी कांबळे, प्रा. आकाश पावले, प्रा. अविनाश पालकर, प्रा. हर्षा उणे,प्रा. ज्योती शिंदे, प्रा.तेजस्विनी परबकर विनायक पाटील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थितीत होत्या.
Comments
Post a Comment