परीख पूल नूतनीकरण समितीचे भर पावसात उपोषण

 परीख पूल नूतनीकरण समितीचे भर पावसात उपोषण



 कोल्हापूर, २५ सिटी न्यूज नेटवर्क 

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बाधणी करण्यासाठी पाश्चात्य देशातील वास्तुविशारद, कन्सल्टंट नेमा, या मागणीसाठी परीख पूल नूतनीकरण समितीने काल दिवस भर सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण भर पावसात केले.


राजर्षी शाहूंनी युरोपीय देशातील नाट्यगृहाच्या धर्तीवर नाट्यगृह तसेच खासबाग मैदान उभारले त्यामुळे हे मैदान जसेच्या तसे उभारावे, अशी सर्वांची मागणी आहे. त्यामुळे गुणवत्तेत कुठेही तडजोड नको अशा वारसास्थळांच्या पुनर्षांधणीचा अनुभव असणाऱ्या पाश्चात्य देशातील निष्यात वास्तुविशारद किंवा संस्थेची सल्लागार म्हणून शासनाने नेमणूक करावी,अशा भावना यावेळी कार्यकत्यांनी व्यक्त केल्या . 


या उपोषणात फिरोज शेख, सुशील हांजे, गौरव लांडगे, प्रशांत चव्हाण , राजवर्धन यादव , प्रवीण रंगापुरे आदी परीख पूल नूतनीकरण समितीचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.


या उपोषणाची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.





Comments