एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेस दिमाखात प्रारंभ
ॲडव्होकेट पी. आर्. मुंडरगी स्मृती ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम पुरस्कृत
एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेस दिमाखात प्रारंभ
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धीबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या ॲडव्होकेट पी. आर. मुंडरगी स्मृती महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आज मंगलधामच्या सभागृहात शानदारपणे प्रारंभ झाल्या.. ...
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर सौ.नीलिमा अडसूळ, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, ब्राह्मण सभा करवीर चे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक शुक्ल, संचालक कृष्णा काशीद व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे यांच्या सर्वांचे हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव व चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव मनिष मारुलकर,उपाध्यक्ष धीरज वैद्य, या स्पर्धेसाठीचे मुख्यपंच सातारा चे आंतरराष्ट्रीय पंच शार्दुल तपासे, उपमुख्य पंच इचलकरंजीचे राष्ट्रीय पंच करण परीट,कोल्हापूरच्या राष्ट्रीय पंच आरती मोदी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी,राष्ट्रीय पंच सूर्याजी भोसले, प्रशांत पिसे, हे उपस्थित होते सांगलीची आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर हिने कार्यक्रमाची सूत्रसंचालन केले.
या स्पर्धा स्विस् लीग पद्धतीने एकूण आठ फेर्यात होणार असून तीन दिवस चालणार आहेत.मुलांच्या व मुलींच्या स्वतंत्र गटात या निवड स्पर्धा होत आहेत.मुंबई, पुणे, ठाणे,रायगड,अहमदनगर,जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद,जालना,नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, लातूर,परभणी, सातारा,सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत 199 बुद्धिबळपटू या स्पर्धे सहभागी झाले आहेत. यापैकी 70 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.
आज झालेल्या दुसर्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित पुण्याचा आदित्य जोशी, द्वितीय मानांकित मुंबई चा गौरांग भंडारी, तृतीय मानांकित मुंबई चा सम्विद पासबोला,चौथा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनी, पाचवा मानांकित मुंबई चा निर्वाण शहा,सहावा मानांकित नागपूर चा अनय पिंपरकर,सातवा मानांकित नागपूर चा कुशाग्र पलिवाल यांच्यासह एकुण 32 जण दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. मुलींच्या गटात दुसर्या फेरीनंतर अग्रमानांकित मुंबईची आद्या पाटील,द्वितीय मानांकित सोलापूरची सान्वि गोरे,तृतीय मानांकित रायगडाची बैजु व्याघा,चौथी मानांकित छत्रपती संभाजीनगरची भूमिका वाघळे,पाचवी मानांकित मुंबईची हिरमई कुलकर्णी यांच्यासह एकुण अकराजणि दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
Comments
Post a Comment