रिलायंस फाउंडेशन महिलांच्या डिजिटल सहभाग वाढवण्यासाठी देणार 10 मिलियन डॉलर्सचे आर्थिक साहाय्य
- USAID आणि BMGF सोबत मिळून महिलांना सशक्त बनवण्याचे लक्ष्य
मुंबई २४ सिटी न्यूज नेटवर्क
रिलायंस फाउंडेशनने अमेरिकेच्या USAID आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन (BMGF) सोबत मिळून "विमेन इन द डिजिटल इकॉनमी फंड (WIDEF)" अंतर्गत 10 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील महिलांना डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सशक्त करणे आणि जेंडर डिजिटल विभाजन कमी करणे आहे.
रिलायंस फाउंडेशनच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, "WIDEF जागतिक सहकार्याचा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि आम्हाला या उपक्रमाचा भाग होण्याचा अभिमान आहे. आम्ही महिलांच्या उपजीविका, आर्थिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्तीकरण वाढवण्यास वचनबद्ध आहोत."
USAID-इंडियाच्या अॅक्टिंग मिशन डायरेक्टर डॉ. अलेक्झांड्रिया ह्यूर्टा यांनी या भागीदारीला महत्त्वपूर्ण म्हटले. त्यांनी सांगितले, "भारत आणि अमेरिकेची ही भागीदारी जेंडर डिजिटल अंतर दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही रिलायंस फाउंडेशनसोबत मिळून लाखो महिलांना डिजिटल अर्थव्यवस्थेचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहोत."
Comments
Post a Comment