दैनिक राशिभविष्य
रविवार, १ सप्टेंबर २०२४
. श्रावण कृष्ण चतुर्दशी. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज वर्ज्य दिवस आहे" *शिवरात्री*
चंद्रनक्षत्र - आश्लेषा/मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क/सिंह. (विष्टी करण शांती करून घ्यावी)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळ आणि गुरूशी शुभ योग आहे. वक्तृव चमकेल. दिलेला शब्द पाळला जाईल. पाळीव पशूंचा लाभ होईल. गृहसौख्य लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात भरभराट होईल. येणी वसूल होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. दुर्बल लोकांना मदत कराल. कठोर वागणे होईल. आत्मविश्वस कमी होऊ शकतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्करणी लावा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. अधिक मेहनत करावी लागेल. मात्र त्याचे उत्तम फळ मिळेल. लवकरच अडचणी दूर होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासोबत मौज कराल. लक्ष्मीची कृपा राहील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. त्याचे सोने करा. कामानिमित्त प्रवास घडतील. सुसंवाद वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गूढ उलगडतील. शत्रू पराभूत होतील. यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. स्वजनाचा विरोध मावळला जाईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. दानधर्म करण्यास उत्तम दिवस आहे. धार्मिक कार्य कराल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र - बुध युती आहे. जुने वाद मिटतील. संयमाची भूमिका घ्या. संतती कडून चांगली बातमी समजेल. परदेश प्रवास घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. शेतीतून उत्तम लाभ होतील. व्यवसाय वाढेल. कीर्ती प्राप्त होईल. मातृसेवा कराल. नैतिकता बळ देईन.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल ग्रहमान आहे. मंगळाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. एखाद्या बाबतीत मनस्ताप सहन करावा लागू शकतो. छोटे प्रवास घडतील.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment