दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

सोमवार, २ सप्टेंबर २०२४





 श्रावण अमावस्या. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


"आज वर्ज्य दिवस आहे." *दर्श - पिठोरी अमावस्या. सोमवती अमावस्या. बैल पोळा.* श्रावणी सोमवार. शिवामूठ - सातू.


चंद्र नक्षत्र - मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. 

 

मेष:- प्रापंचिक सुख मिळेल. संततीशी सुसंवाद साधाल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. मोठे करार आज नकोत.

     

वृषभ:- चंद्र केतूच्या नक्षत्रात आहे. सामाजिक काम करतांना अप्रिय अनुभव येऊ शकतात. घरगुती कटकटी टाळा. आराम करा.

 

Trade enquiry 9423801280

मिथुन:- तृतीय स्थानी चंद्र आहे. तिसरा सूर्य आहे. भावंड मदत करतील. पराक्रम गाजवाल. हातांची काळजी घ्या.


कर्क:- फारसा आशादायक दिवस नाही. कौटुंबिक कलह होऊ शकतात. घशाची काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. 

 

सिंह:-  तुमचा राशीस्वामी तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. कष्ट केल्यास यश मिळेल. राजकीय भाष्य टाळा.

  

कन्या:- आज अनुकूल दिवस नाहीये. दिरंगाई अनुभवाल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. 

 

तुळ:- लाभ स्थानी चंद्र आहे. सूर्य अनुकूल असले तरीही फारसा दिलासा मिळू शकणार नाही. कटकोर नियोजन करा.  

 

वृश्चिक:- कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. वरिष्ठ खुश होतील.


धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील.

 

मकर:- सध्या ग्रहमान अनुकूल नाही. महत्वाची कामे आज टाळावीत. गुंतवणूक करू नका. विचारपूर्वक कृती करा.  

 

कुंभ:- सप्तम चंद्र पत्नीची उत्तम साथ मिळवून देईन. गुप्त शत्रूचा त्रास मात्र वाढेल. कोर्ट कामात दिरंगाई होईल.

 

मीन:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. विरोधक पराभूत होतील. 


 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments