दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 बुधवार, ४ सप्टेंबर २०२४





भाद्रपद शुक्ल प्रतिपदा. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज उत्तम दिवस आहे" 


नक्षत्र - उत्तरा (फाल्गुना)आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह/ (सकाळी ९.४७ नंतर) कन्या.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभ होतील . अचानक धनलाभाचे योग आहेत. नात्यात विनाकारण गैरसमज होऊ शकतात.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. गुंतवणुकीतून यश मिळेल. 


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर भूमिका घ्याल. घरगुती वाद होऊ शकतात.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक फायदा होईल. व्यापारात वृद्धी होईल. मात्र जमीन व्यवहारातून नुकसान संभवते.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कलाकारांना उत्तम यश मिळेल. नेतृत्व गुण चमकतील.

  

Trade enquiry 9423801280

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. सुखे मिळतील. सिद्धी प्राप्त होतील.  

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करून घ्या. संध्याकाळ मित्र मंडळी सोबत व्यतीत होईल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. दशम आणि लाभ स्थानी चंद्र आहे. हर्षल शी शुभ योग आहे. प्रसन्न राहाल.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/व्यवसायात चांगले अनुभव येतील. वृद्धी होईल. सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सकाळच्या सत्रात संथपणा जाणवेल. दुपार नंतर कामाचा वेग वाढेल. शेअर्स मधून लाभ होतील. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. मनन आणि चिंतन करण्यास अनुकूल कालावधी आहे. अष्टम स्थानी चंद्र येत आहे. गुंतवणूक काळजीपूर्वक करा.

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. विजयी घोडदौड चालूच राहील.  


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments