"श्वास" प्रमाणेच "हया गोष्टीला नावच नाही" हा चित्रपटही प्रबोधनपर वेगळ्या धाटणीचा: संदीप सावंत यांचे मनोगत
"श्वास" प्रमाणेच "हया गोष्टीला नावच नाही" हा चित्रपटही प्रबोधनपर वेगळ्या धाटणीचा: संदीप सावंत यांचे मनोगत
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
लेखक सतीश पाटील यांच्या मृत्युस्पर्श या कादंबरीवर आधारित ' हया गोष्टीला नावच नाही 'हा चित्रपट देखील श्वास - नदी वाहते चित्रपट प्रमाणेच नक्कीच वेगळ्या धाटणीचा प्रबोधनपर आहे. अनेक लोक, तरुण आपल्या समोर आलेल्या परिस्थितीतून, संघर्षातून कशा पद्धतीने मार्ग काढतात याचं चित्रण या चित्रपटातून केलं आहे. श्वास सारखाच हा देखील एक सामाजिक समस्या मांडणारा चित्रपट असूनही तो वेगळ्या पद्धतीने मांडला असल्याचे मत दिग्दर्शक - पटकथा - संवाद लेखक संदीप सावंत यांनी व्यक्त केले. कोल्हापूर फिल्म सोसायटी च्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होतें. हा वार्तालाप शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. वार्तालाप झाल्यानंतर या गोष्टीला नावच नाही या चित्रपटाचे प्रदर्शन पूर्व सादरीकरण करण्यात आले.
सावंत म्हणाले, हा चित्रपट सतीश पाटील यांच्या मृत्यूस्पर्श या कादंबरीवर आधारीत आहे . याच परिसरातील कलाकार या चित्रपटात अभिनय करत आहेत. या सगळ्याच दृष्टीने हा चित्रपट वेगळा आहे.या चित्रपटासाठी डिकेटीई शिक्षण परिवार - सिनर्जी हॉस्पीटल यांचे मोलाचे सहकारी लाभले असून इचलकंरजी - गणेशवाडी मिरज नृसिंहवाडी परिसरात यांचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉ .सतिशकुमार पाटील आणि अंजली पाटील हे आहेत . तर यामध्ये जयदीप कोडोलीकर - प्रथमेश अत्रे - चैतन्य जवळगेकर - अनुराधा धामणे- प्रतिक्षा खासनीस अवधूत पोतदार आणि सीमा मकोटे यांच्या प्रमुख भुमिका आहेत . यासह सुरेश पाटील , डॉ . रवींद्र आरळी , प्रसाद जगताप यांचे ही सहकार्य लाभले आहे आहे.यावेळी फिल्म सोसायटीचे दिलीप बापट, विद्यासागर अध्यापक, सतीश कुलकर्णीआदि उपस्थित होते .
Comments
Post a Comment