देशविदेशातील ५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने लोहपुरुष ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा राजाराम तलाव येथे संपन्न

 देशविदेशातील ५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने लोहपुरुष ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा राजाराम तलाव येथे संपन्न    

कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर ही क्रिडानगरी कलानगरी जगभर प्रसिद्ध आहे.या नगरीत अनेक स्पर्धा होत असतात यातीलच कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या  वतीने दरवर्षी भरविण्यात येणारी ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा आज राजाराम तलाव येथे संपन्न झाल्या.आज सकाळी ६ वाजता कोल्हापूरचे दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून सुरू करण्यात आल्या.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी आरोग्यासाठी स्विमिंग,सायकलिंग आणि रनींग हे महत्वाचे असून स्पर्धकांसोबतच सर्वांनी यात सहभागी व्हावे असे उद्गार काढले या स्पर्धेतील स्प्रिंट डूएथलॉन स्पर्धेत जिल्हाधिकारी यांनी सहभाग घेतला होता.यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खीलारी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण  आणि रगेडियनचे आयर्नमॅन आकाश कोरगावकर डॉ.विजय कुलकर्णी, डॉ.प्रदीप पाटील, आशिष  तंबाके, एस.आर.पाटील,गोरख माळी,आदित्य शिंदे,महेश शेळके तसेच तगडा ग्रुप आदी उपस्थित होते.



       स्पर्धकांमध्ये खेळाची उत्तेजना निर्माण व्हावी स्पर्धकांना व्यासपीठ मिळावे यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आज राजाराम  तलाव येथे  लोहपुरुष या नावाची ट्रायथलॉन आणि डूएथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.देश विदेशातून ५०० पेक्षा अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते.आज राजाराम तलाव परिसराचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि रग्गेडियन  वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

        या स्पर्धांमध्ये २ किलोमीटर पोहणे,९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग अशा तीन प्रकारात या स्पर्धा पार पडल्या.ट्रायथलॉनमध्ये स्विमिंग,सायकलिंग आणि रनिंग या स्पर्धांचा समावेश होता तर  डूएथलॉन मध्ये केवळ सायकलिंग व रनिंग स्पर्धा झाल्या.



यातील सायकलिंग ही राजाराम तलाव येथे सरनोबत वाडी,गोकुळ शिरगाव, लक्ष्मी टेकडी, एम आय डी सी पुन्हा राजाराम तलाव अशी पार पडली.तर रनींग स्पर्धा राजाराम तलाव येथे सुरु होऊन ती  सरनोबत वाडी,टोल नाका,नॅनो टेक्नॉलॉजी बिल्डिंग,डी ओ टी बिल्डिंग पुन्हा राजाराम तलाव अशी पार  पडली.

तर पोहणे स्पर्धा राजाराम तलाव येथे पार पडली.

 स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना, टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग आणि अल्पोपहार आदी सुविधा दिल्या गेल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्तीपत्र  देण्यात आली.

या स्पर्धेच्या ठिकाणी एकूण २०० पेक्षा अधिक व्होलेंटीयर तैनात होते.तर पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य सुविधाही पुरवली गेली.


स्पर्धेचा निकाल 


लोहपुरुष  केएससी ट्रायथलॉन आणि डूयेथलॉन 

केएससी ऑलिंपिक डूयेथलॉन 

१८ ते ३० पुरुष वयोगट


 १)वरद प्रदीप पवार

 २)यश कोरगावकर 

 ३) परिपोष अजयराज वाडकर



केएससी ऑलिंपिक ड्युएथलॉन १८ ते ३० महिला



१)कस्तुरी ताम्हणकर

२)अंकिता बिरारी


केएससी ऑलिम्पिक ड्युएथलॉन ३१ ते ४५ पुरुष



१)संतोष शिंदे


२)अभ्युदय घाटे


३)नितेश बसगरे


केएससी ऑलिंपिक ड्युएथलॉन ३१ ते ४५ महिला


१)मीनल काशीकर


२)भारती सिंघल


 केएससी ऑलिम्पिक ड्युएथलॉन ४५ वर पुरुष


१)शिवप्रसाद ठाकूर


२)एम इल्यास अब्दुलरहमान दफेदार


३)प्रेम राजानी


 केएससी ऑलिंपिक ड्युएथलॉन ४५ वर महिला


१)अर्चना सोमाणी


२)मनिका जैन



केएससी स्प्रिंट ड्युएथलॉन १६ ते ३० पुरुष


१)आदित्य अमित सोनवणे


२) पद्मराज मेकळके



 ३)आरव पंकज वटकर


केएससी स्प्रिंट ड्युथलॉन ३१ ते ४५पुरुष


 १)प्रशांत जी शिंगाडे


 २)रविकांत साळुंखे


 ३)अश्विन पाटील


केएससी स्प्रिंट ड्युथलॉन ३१ ते ४५ महिला


 १)प्रिया अमित पंडित


 २)केतकी कर्वे


केएससी स्प्रिंट ड्युएथलॉन ४५ वर पुरुष



 १)उत्तम दिनेशचंद्र पदियार



 २)रमेश माने


३)निलेश मधुकर एकतपुरे


केएससी स्प्रिंट डूयेथलॉन  ४५ वर महिला



 १)बाळा रोकडे


२)माधुरी उमेश पंचरिया




केएससी स्प्रिंट 

 ट्रायथलॉन १६ ते ३० पुरुष


 १)अवधूत संपत खिलारी


२)ल्यूक कॅब्राल



 ३)जॉन कॅब्राल


केएससी स्प्रिंट ट्रायथलॉन १६ ते ३० महिला



 १)अनन्या कौशिक


 २)निहारिका पाटील


केएससी स्प्रिंट  ट्रायथलॉन 31-45 पुरुष



 १)राज कोरगावकर


 २)निलेश उपांकर


 ३)अभिमन्यू वाधवा


केएससी स्प्रिंट ट्रायथलॉन 31-45 महिला



 १)चित्रा रमेश सापळे


२)ईशा अष्टा


 ३)सुवर्णा कौशल


 केएससी स्प्रिंट  ट्रायथलॉन 45 वरील पुरुष 


१)संजय नामदेवराव चव्हाण


 २)रवींद्र साळुंखे


 ३)चंद्रकांत बाळासो मगर


 केएससी स्प्रिंट ट्रायथलॉन 45 वरील महिला



 १)निलांबरी जग तप


२)मनिषा सक्सेना



 केएससी हाफ आयर्न डिस्टन्स ट्रायथलॉन रिले ओपन


 १)श्रीराम जालिंदर शिंदे


 २)दिक्षा बलकवडे


 ३)हितेंद्र चौधरी




केएससी ऑलिम्पिक  ट्रायथलॉन १६ ते ३० पुरुष


 १)हृषिकेश पाटील


 २)विश्वेश गुप्ता


 ३)गरव नरेंद्र जैन


केएससी ऑलिम्पिक ट्रायथलॉन १६ ते ३० महिला


१)आरती श्रीपती कांबळे


 २)मधुरा सुर्वे


केएससी ऑलिम्पिक  ट्रायथलॉन ३१ते ४५ पुरुष


 १)तन्मय नहार


 २)कुरुष वाडिया


३)यश टाकी



केएससी ऑलिम्पिक  ट्रायथलॉन ३१ ते ४५ महिला


 १)स्मिता राहुल झांजुर्णे


 २)आरती अनिल दामले


 ३)अनुरुपा भौमिक


 केएससीऑलिम्पिक  ट्रायथलॉन ४५ वयोगट वरील पुरुष 



 १)महेश माधवराव मुळे



 २)अनिरुध पंड्या


३)संजीव चिमलगी


 केएससीऑलिम्पिक  ट्रायथलॉन ४५ वर महिला


१) विनीता जाधवराव


 २)मुबारका


३)कविता अनिल जाधव





लोहपुरुष  केएससी ट्रायथलॉन १८ते ३०


१) राजवर्धन सचिन घाटगे


 २)तन्ने सोनी


 ३)सिद्धांत रितेश रावखंडे


लोहपुरुष केएससी  ट्रायथलॉन 


 १)वैष्णवी नानवरे


लोहपुरुष  केएससी  ट्रायथलॉन ३१ ते  ४५


 १)राहुल एस. शिरसाट


 २)संजय सुर्यवंशी


 ३)डॉ. संदीप चिखले


लोहपुरुष   केएससी;ट्रायथलॉन ३१ ते ४५


 १)कोमल रेणुके


२) जिया गफार शेख


३)शिल्पी प्रसाद


लोहपुरुष केएससी ट्रायथलॉन ४५ वरील


१)डॉ. प्रीतम असरानी


 २)प्रदीप कात्रोडिया


 ३)अशोक जशवंतलाल मकवाना

Comments