संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते : ॲड. विजय गव्हाळे
कोल्हापूर- 29 सिटी न्यूज नेटवर्क
संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारतामध्ये 29 राज्य, 10 धर्म, 136 कोटी लोकसंख्या आणि हजारो भाषा असून देखील संविधानाने देशाला एकत्र बांधून ठेवलेले आहे. कोणी काहीही केले तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही. आज अति सामान्य समाज मुख्य प्रवाहात येऊन चमक दाखवतोय हे फक्त संविधानाने शक्य झाले आहे, असे मत एडवोकेट विजय गव्हाळे (बारामती) यांनी सामाजिक संवाद मेळाव्या मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले...
विवेक विचार मंच तर्फे आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सामाजिक संवाद मेळाव्याचे खरे मंगल कार्यालय कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते.
विवेक विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागर शिंदे, कोल्हापूर जिल्हा संयोजक डॉ. किशोर गायकवाड, महानगर संयोजक सुनील वांकर यावेळी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करुन संविधान उद्देशिका वाचन, भीम व शिवगीताचे गायन झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती व वंचित घटकांमधील प्रज्ञावंत यांचा विवेक विचार मंचतर्फे सत्कार करण्यात आला यामध्ये सदानंद दिघे, डॉक्टर कौस्तुभ वाईकर, पत्रकार रवींद्र कांबळे, प्राणिमित्र प्रशांत साठे, अनिल कामत, विमल घोडके, लालासो पवार, मोनाली आवळे, आनंद खामकर व गुणवंत नागटीळे यांचा समावेश होता.
या सामाजिक संवाद मेळाव्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, सामाजिक न्याय, शासकीय योजना या संदर्भात चर्चा व मोकळेपणाने संवाद झाला.
सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी याबाबतीत आपली मते मांडली. प्रत्येक तालुक्यात एक संविधान भवन निर्माण करावे त्याचा बहुजन विद्यार्थ्यांना फायदा होईल. एक गाव, एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी असावी. सद्य परिस्थितीत फक्त एकच धर्म म्हणजे मानवता धर्म असावा तसेच अनुसुचित जातीची देखील जनगणना व्हावी असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
विवेक विचार मंचच्या माध्यमातून आमचे मत शासनापर्यंत पोहोचवावे असे काहींनी सांगितले.
श्री सागर शिंदे यांनी सर्वांच्या सोबत संवाद साधला ते म्हणाले भारत देश म्हणून आपण सर्वांनी एकत्र असले पाहिजे तसेच त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली भारतीय संविधान हा प्रतिष्ठेचा मुद्दा असला पाहिजे व आपण सर्वांनी संविधानाचा सन्मान राखला पाहिजे असे त्यांनी सांगितले सध्या समाजात जे चुकीचे विमर्श पसरवले जातात तसेच शहरी माओवाद, शासकीय योजना व त्यांचे फायदे, समाजात घडणाऱ्या न्याय, अन्यायाच्या अनेक घटनांबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमास समाजातील अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष नेते यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ किशोर गायकवाड यांनी सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक व परिचय तर आभारप्रदर्शन अनिल कामत यांनी केले. हा सामाजिक संवाद मेळावा यशस्वी होण्यासाठी सुनील आडवी, बसवराज सज्जन, सुरेश वाळवेकर, उमेश कांबळे, संदीप कांबळे, गुरुनाथ खानोलकर, प्रशांत मालनकर, शशांक देशपांडे व अनिरुद्ध कोल्हापुरे यांनी विशेष प्रयत्न केले.
Comments
Post a Comment