रविवारी ( दि.२९ ) रोजी १५ वर्षांखालील मुला- मुलींची जलद बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
रविवार, (दि. २९ सप्टेंबर) रोजी अनुज चेस अॅकॅडमीच्या वतीने १५ वर्षांखालील मुला- मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यानिकेतन स्कूल व इंजिनिअरिंग कॉलेज साळोखेनगर येथे ही स्पर्धा होईल.
स्पर्धा १५ वर्षांखालील (जन्म तारीख : १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर), १३ वर्षांखालील (१/१/२०११ किंवा त्यानंतर), ११ वर्षांखालील (१/१/२०१३ किंवा त्यानंतर), ९ वर्षांखालील (१/१/२०१५ किंवा त्यानंतर), ७ वर्षांखालील (१/१/२०१७ किंवा त्यानंतर) अशा विविध गटांसाठी होणार आहे. दि. २८ पर्यंत सहभाग नोंदवावा.
स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील, बाबुराव पाटील, सूर्यकांत चोडणकर, अनुराग पाटील, अनुष्का पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment