महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल यांचा आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्रीने सन्मान
![]() |
राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्सचे भरत सोनमल ओसवाल यांचा अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्री पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शेजारी मान्यवर. |
कोल्हापूर, २८ सिटी न्यूज नेटवर्क
राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्सचे भरत सोनमल ओसवाल यांचा मुंबई येथे अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सेवा, सचोटी आणि दर्जा या गुणांच्या जोरावर कोल्हापूर येथील महेंद्र ज्वेलर्सने पश्चिम महाराष्ट्रातील सराफी बाजारपेठेत स्वतंत्र ठसा उमटवला आहे. पारदर्शी व्यवहार, सोने-चांदी, डायमंड अशा विविध प्रकारच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या महेंद्रने जनमाणसातील आपले स्थान आणि विश्वासार्हता भक्कम केली आहे.
वरदाजी रत्नाजी ओसवाल यांनी १९०५ मध्ये गुजरीत सुरू केलेल्या सराफी पेढीचे वटवृक्षात रूपांतर होऊन १९९८ साली राजारामपुरीत महेंद्र ज्वेलर्स ही अलिशान आणि भव्य शोरूम दिमाखाने सुरू झाली.
महेंद्र ज्वेलर्सने गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड न करता सातत्यपूर्ण, नावीन्यपूर्ण कलाकुसर आणि डिझाईनवर भर देताना नेहमीच ग्राहक हिताला प्राथमिकता दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील सोन्या-चांदीची प्रमुख पेढी म्हणून महेंद्र ज्वेलर्सचा नावलौकिक कायम आहे.
दरम्यान, मुंबई येथे जीजेसीच्या वतीने २५ ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या जीजेसी शो मध्ये भरत ओसवाल यांचा अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्रीने सन्मान करण्यात आला. सौरभ गाडगीळ, आशीष पेठे, दिलीप लागू यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जीजेसी अध्यक्ष संयम मेहरा, उपाध्यक्ष राजेश रोकडे, वर्धमान कोठारी, नितीन साखरिया, जयपाल साखरिया, अतुल पेठे, हरिश सोनी यांच्यासह मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment