कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील कामासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी शासनाकडून आणला २५ कोटीचा निधी
कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील कामासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी शासनाकडून आणला २५ कोटीचा निधी
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, बगिचा, विद्युत दिवे, हायमास्ट, व्यायाम शाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कृष्णराज धनंजय महाडिक यांनी राज्य सरकारकडून सुमारे २५ कोटी रूपयांचा निधी आणला आहे. याशिवाय कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षि शाहू जलतरण तलावाच्या दुरूस्तीसाठी आणि सुशोभिकरणासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे.
आजवर कृष्णराज महाडिक यांनी एक यशस्वी फॉर्म्युला थ्री रेसर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसेच एक लोकप्रिय व्हिडीओ ब्लॉगर म्हणूनही त्यांनी लौकिक निर्माण केला आहे. या व्हिडीओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार्या उत्पन्नाचा विनियोग सामाजिक कामासाठी केला आहे. समाजकार्याची आवड आणि बाळकडू असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्हयाचे प्रमुख सामाजिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा समजून घेवून, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अनुषंगाने आजवर त्यांनी कोल्हापूरशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिली. यावेळी विविध प्रभागातील नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment