आप रिक्षा संघटनेच्या वतीने ४०० फॉर्म जमा
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी महामंडळाकडे नोंदणी करावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद म्हणून आम आदमी रिक्षा संघटनेच्या वतीने ४०० रिक्षाचालकांचे फॉर्म प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी 'आप'चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, राकेश गायकवाड, संजय नलवडे, बाबुराव बाजारी, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, अमरसिंह दळवी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment