प्रमोद भोसले स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातारचा अनिकेत बापट अजिंक्य

 प्रमोद भोसले स्मृती खुल्या  जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातारचा अनिकेत बापट अजिंक्य तर कोल्हापूरचा सोहम खासबारदार उपविजेता व उमेश कुलकर्णी तृतीय



 कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क 

 खरे मंगल कार्यालय सन्मित्र हौसिंग सोसायटी, कोल्हापूर येथे युवक मित्र मंडळ व विझार्ड चेस क्लब राजारामपुरी आयोजित दुसर्या प्रमोद भोसले स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत चौथा मानांकित सातारच्या अनिकेत बापटने नऊ पैकी साडेआठ गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले त्याला रोख सात हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. नववा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबागदार आठ गुणांसह उप विजेता ठरला त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविले. द्वितीय मानांकित सातारचा उमेश कुलकर्णी लि साडेसात गुण व सरस बखोल्स टायब्रेक गुणामुळे तृतीय स्थान मिळाले उमेश ला तिसऱ्या क्रमांकाचे रोख चार हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले. इचलकरंजीचा विवान सोनी व अकरावा मानांकित मिरजेचा अभिषेक पाटील या दोघांचे साडेसात गुण झाले होते टायब्रेक गुणांनुसार विवानला चौथा तर अभिषेकला पाचवा क्रमांक मिळाला. विवान ला रोख दोन हजार रुपये तर अभिषेकला पंधराशे रुपयाचे बक्षीस देण्यात आले. 

 स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्रीमती कल्पलता प्रमोद भोसले, महेश्वर भोसले, शतावरी भोसले, भरत चौगुले,माधव देवस्थळी, बी एस नाईक, मयूर मोरे, सुहास मोठे व म्हेत्रे  मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनादी खासबागदार, शार्दुल तपासे, दीपक वायचळ, रोहित पोळ व अभिजीत चव्हाण उपस्थित होते.

 इतर बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे 

 क्रमांक 6) अनिश गांधी कोल्हापूर  7) ओंकार कडव सातारा  8) मुदस्सर पटेल मिरज 9)) आदित्य कोळी सांगली 10) नितीन परीक इचलकरंजी  11) रवींद्र निकम इचलकरंजी 12) सौरिश काशिळकर रत्नागिरी 13) प्रशांत आणवेकर बेळगाव  14) ध्रुव गांधी सातारा 15) संतोष कांबळे कोल्हापूर 16) व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर  17) संतोष रामचंद्र कसबे डिग्रज  18) प्रणव पाटील कोल्हापूर 19) अथर्व चव्हाण कोल्हापूर 20) नजीर काझी फलटण 21) अंशुमन शेवडे बेळगाव 22) संतोष सरीकर इस्लामपूर 23) स्वरूप जोशी कागल  24) शंकर सावंत उत्तुर  25) अथर्व तावरे इचलकरंजी 

 विविध वयोगट व उत्तेजनार्थ बक्षीसे

 उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू

1) महिमा शिर्के कोल्हापूर 2) जिया शेख सातारा 

 उत्कृष्ट ज्येष्ठ साठ वर्षावरील बुद्धिबळपटू

1) माधव देवस्थळी कोल्हापूर 2) बी एस नाईक कोल्हापूर 3) भारत पाटोळे निपाणी

 उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू

1) यश गोगटे रत्नागिरी 2) साक्षी गावडे कोल्हापूर 

 सतरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळ पटू

1) अपूर्व देशमुख सातारा   2) शंतनू पाटील कोल्हापूर  3) मानस महाडेश्वर कोल्हापूर 4) प्रणव मोरे कोल्हापूर 5) केशव सारडा इचलकरंजी 6) तनय सहस्त्रबुद्धे सांगली 7) बावडेकर कोल्हापूर 8) शिवम भोसले वारणानगर  9)वेदांत नवले बेळगाव  10) आहंती कदम बेळगाव

 चौदा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

1) अरीन कुलकर्णी कोल्हापूर  2) अभय भोसले रेंदाळ 3) स्वरूप साळवे गडहिंग्लज  4) अर्णव भस्मे बेळगाव  5) हर्ष धनवडे बेळगाव  6) सारा हरोले सांगली 7) सिद्धी बुबणे नांदणी  8) सर्वेश पोतदार कोल्हापूर  9) अथर्व सुतार  सांगली 10) सृष्टी जोशीराव कोल्हापूर 

 अकरा वर्षाखालील उत्कृष्ट

1) रुद्रवीर पाटील गडहिंग्लज  2)रिधान कारवा इचलकरंजी 3) अवनीश जितकर कोल्हापूर   4) साईश देसुरकर बेळगाव   5) अधिराज डोईजड वारणानगर  6) शनाया मालानी इचलकरंजी 7) अर्णव वरुटे सांगली   8) स्वस्तिक यलगी बेळगाव   9) अवनीश बडवे सांगली  10) रेयांश भट्टड इचलकरंजी

 *उत्कृष्ट बुद्धिबळ अकादमी* 

1) केपीज चेस अकादमी सांगली   2) गोल्डन स्क्वेअर अकॅडमी बेळगाव  3) केन चेस  क्लब इचलकरंजी 

 *उत्कृष्ट बुद्धिबळ  शाळा*

1) तात्यासाहेब कोरे इंग्लिश मीडियम स्कूल वारणानगर  2) संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे 3) चाटे स्कूल कोल्हापूर

Comments