मानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे - कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांची कार्यशाळेत प्रतिपादन
मानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे - कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांची कार्यशाळेत प्रतिपादन
कोल्हापूर ६ सिटी न्यूज नेटवर्क
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर यांचेवतीने जग प्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांची “माझे जीवन मुल्यांना प्रतिसाद” (Responding to my life values) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संस्थेचे शिवाजी पेठ येथील सभागृहमध्ये उत्साहात संपन्न झाली. ही एक दिवशीय कार्यशाळा दोन सत्रांत आयोजित केली होती. पहिल्या सत्रात आर्कि.शिरीष बेरी यांनी त्यांचा आर्किटेक्चरचा जीवनप्रवास उलघडून दाखवला. मानवकेंद्रीत मुल्यांवर आधारीत जीवनशैलीपेक्षा सार्वत्रिक मुल्यवृत्तीवर आधारीत जीवन अंगिकरून त्याचा आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये चांगला, चपखल उपयोग कसा करता येतो, ते त्यांनी सांगितले तसेच साधेपणा, संय्यम, निसर्गाप्रती सहवेदना, सर्वांप्रती सहानुभूती आणि शांतता या चार मुल्यांचा डिझाईनमध्ये वापर कसा करावा हे बेरी सरांनी अधोरेखित केले.
दुसऱ्या सत्रात तृतीय वर्ष, चतुर्थ वर्ष आणि अंतिम वर्ष बी.आर्चच्या विद्यार्थ्यांना डिझाईन या विषयांवर बेरी सरांनी मोलाचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी डिझाईन विषयांमध्ये सुरूवातीपासून सृजनशीलतेचा वापर योग्यप्रकारे कसा करावा याबद्दल बेरी सरांनी चर्चा केली.
या कार्यशाळेचा लाभ शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या इतर आर्किटेक्चर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील घेतला. ही कार्यशाळा आयोजित करणेसाठी संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील आणि कॉलेजचे प्राचार्य श्री. सी. एस. दुदगीकर यांचे मार्गदर्शन लाभले. सहभागी विधार्थी वर्गाच्या आग्रहास्तव आगामी काळात असे उपक्रम सातत्याने घेण्याचे संस्थेचे नियोजन आहे

Comments
Post a Comment