5G कव्हरेज आणि डाउनलोड स्पीड मध्ये जिओचा दबदबा - ओपन सिग्नल
• 5जी उपलब्धता स्कोअर– जिओ 66.7%, एअरटेल 24.4%
• ओव्हरऑल डाउनलोड स्पीड – जिओ 89.5 MBPS, एअरटेल 44.2 MBPS
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
देशात 5G कव्हरेजच्या बाबतीत रिलायन्स जिओ सलग पहिल्या क्रमांकावर आहे. ओपन सिग्नलच्या ताज्या अहवालानुसार ‘5जी-उपलब्धता’ श्रेणीत जिओने 66.7% स्कोअर मिळवला आहे. जिओला एअरटेलपेक्षा 42 टक्के पॉइंट्सची आघाडी मिळाली आहे. एअरटेलचा स्कोअर फक्त 24.4% आहे. हा स्कोअर थेट 5G कव्हरेजशी संबंधित आहे. 5G च्या विस्तृत उपलब्धतेमुळे जिओ 5G वापरकर्ते जवळपास दोन-तृतीयांश वेळ 5G शी कनेक्ट असतात, तर कमी 5G कव्हरेजमुळे एअरटेल वापरकर्त्यांना फक्त एक-चतुर्थांश वेळच 5G वर घालवावा लागतो.
डाउनलोड स्पीड अनुभवाच्या श्रेणीत देखील जिओचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले आहे. जिओ वापरकर्त्यांना एकूण सरासरी डाउनलोड स्पीड सुमारे 89.5Mbps मिळाली - जी एअरटेलच्या 44.2Mbps पेक्षा जवळपास दुप्पट आहे. 16.9Mbps च्या स्कोअरसोबत व्होडाफोन-आयडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर BSNL 3.1Mbps सह खूप मागे आहे. इंटरनेट सर्फिंग, मोठ्या फाईल्स डाउनलोड करणे, व्हिडिओ पाहणे आणि म्युझिक ऐकण्यासाठी डाउनलोड स्पीड हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो.
ओव्हरऑल कव्हरेज अनुभवाच्या श्रेणीत देखील रिलायन्स जिओ खूपच पुढे आहे. 10 गुणांच्या मापदंडावर 9 गुणांसह जिओने कव्हरेज अनुभव पुरस्कार जिंकला आहे. एअरटेल 7.1 गुणांसह खूप मागे आहे. तर 3.7 गुणांसह व्हीआय तिसऱ्या स्थानावर आहे. BSNL 1.2 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. स्थिर कनेक्शन किंवा म्हणायचे तर सातत्याच्या बाबतीत देखील जिओ त्याच्या प्रतिस्पर्धी एअरटेलपेक्षा पुढे आहे. एअरटेलच्या 63.3% च्या तुलनेत जिओचा स्कोअर 66.5% आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment