दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४.






 अश्विन शुक्ल एकादशी/द्वादशी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


"आज क्षय तिथी आहे." *भागवत एकादशी*


चंद्र नक्षत्र - शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. (विष्टी करण शांती करून घेणे) 

 

मेष:- सूर्याचा मंगळाशी केंद्र योग आहे. अति धाडस नको. प्रापंचिक सुख मिळेल. संततीशी सुसंवाद साधाल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. 

     

वृषभ:-  सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रसंगी कठोर बोलावे लागेल. शब्दास मान द्यावा. कामाचा जोर वाढेल. 

 

मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे.  पुण्याई मदत करेल. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील.


कर्क:- अनुकूलता नाही. अष्टम स्थानी चंद्र - शनी युती आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. प्रेमात अपयश संभवते.

 


सिंह:-  आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. कष्ट केल्यास यश मिळेल. वादविवाद टाळा. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.

  

कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. आरोग्य सांभाळा. 

 

तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे.  सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. संतती बाबत चांगली बातमी समजेल. शेअर्स मध्ये गुंतवणूक नको.

 

वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. जमिनीची कामे मात्र लांबणीवर पडतील.  


धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. मौल्यवान खरेदी होईल. चैन कराल.

 

मकर:-संमिश्र कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. विनाकारण वादात पडू नका. कुटुंबास वेळ द्या.   

 

कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. आत्ममग्न व्हाल. नवीन मार्ग सापडतील.

 

मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र देणी द्यावीच लागतील. दानधर्म करावा.


 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments