दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

बुधवार, १६ ऑक्टोबर २०२४.




 अश्विन चतुर्दशी/पौर्णिमा. क्रोधी नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज उत्तम दिवस आहे" *कोजागिरी पौर्णिमा*  


नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा. (रात्री ७.१८ नंतर ) रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानी पौर्णिमा आहे. नवीन संधी चालून येतील. मात्र एक गव्हाचा दान पेरल्याशिवाय हजारो दाणे मिळत नाहीत. खर्च करावा लागेल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल पौर्णिमा आहे. आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. आनंदी राहाल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल. प्रसन्न ग्रहमान सर्व स्वप्ने साकार करतील. नोकरीत सुखद अनुभव येतील.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आनंदी कालावधी आहे. अनुकूल चंद्र रवी योग नावलौकिक आणि सरकार दरबारी वजन वाढवतील. कामे मार्गी लागतील. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायात वाढ होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. समाधानी राहाल. सहकार्य मिळेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. ज्ञानपिपासा वाढीस लागेल. आर्थिक प्रगती होईल. संधी प्राप्त होतील.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. धर्म कार्य कराल. अचानक लाभ होतील. 

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सामाजिक संबंध मजबूत होतील. नवनवीन योजना पार पडतील. सन्मान मिळतील. धाडसी निर्णय घ्याल. 

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्रगती साध्य होईल. येणी वसूल होतील. आर्थिक चिंता मिटतील.  


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमचं द्वितीया स्थानी पौर्णिमा आहे. कुत्टुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होतील. क्षितिजे उंचावतील.

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक प्रगतीस अनुकूल कालावधी आहे. 


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments