दैनिक राशिभविष्य
शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४.
आश्विन कृष्ण २ स्वाती . राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
मेष:- चंद्राचा गुरूशी शुभयोग् आहे. नोकरीत चांगले अनुभव येतात. वरिष्ठ मदत करतील. उत्तरार्ध अधिक चांगला आहे.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. भेटी गाठी होतील. जुनेमित्र भेटतील. मन आनंदी राहील.
मिथुन:- उच्च दर्जाचे आध्यत्मिक लाभ होतील. खर्च वाढतील. विशेष निमित्त साधून नवीन वाटचाल सुरू कराल.
कर्क:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. या कालावधीत महत्वची कामे पूर्ण करून घ्या. बुद्धीचा योग्य वापर कराल. प्रगती साधाल.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मोठी झेप घ्याल. व्यवसायव वाढेल. पूर्वार्ध अनुकूल आहे.
कन्या:- संतती कडून चांगली बातमी समजेल. शिक्षणात यश मिळेल. छोटी सहल घडेल.
तुळ:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नातेवाईक येतील. प्रवास घडतील. घरगुती समारंभ घडेल.
वृश्चिक:- पूर्वार्धत उत्तम व्यावसायिक यश लाभेल. भावंड भेटतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळी आणि नात्यातून सहकार्य मिळेल. उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे. मन प्रसन्न राहील.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल.
कुंभ:- दिवस फारसा आशादायक नाही. साचलेली कामे पूर्ण करा. खर्च वाढतील. संध्याकाळ मात्र सुखद आणि आनंद देणारी आहे.
मीन:- उत्तम दिवस आहे. प्रगती साध्य कराल. आरोग्य सुधारेल. स्वप्ने साकार होतील. संध्याकाळ खर्च वाढवणारी असेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
१९ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात जन्म घेतात. एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात अडथळे येऊ शकतात. मात्र वृत्ती संशोधक असते. स्वभाव तापट आणि हेकट असल्याने भांडणे होऊ शकतात. प्रेमप्रकरणात घाई करू नये. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा लाभते. तुम्हाला इतरांची लुडबुड सहन होत नाही. तुम्ही जीवनात उच्च तेच निवडतात. फार सखोल अभ्यास 'न' करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आई-वडील पत्नी इतर नातेवाईक यांच्यापासून तुम्हाला लाभ होतात. तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे. तुमचा स्वभाव धडपडा आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सणसणाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाटते. तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार होतात. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुम्हाला कला आणि प्रवास यांची आवड आहे. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. प्रेम सहानुभूती आणि आदर हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, कपडे, वाहने, घरे यांच्या तुम्हाला आकर्षण असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात मात्र तुमचा स्वभाव खर्चिक आहे. तुम्हाला प्राणी प्रिय असतात. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. हातातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुमच्यामध्ये संयम आहे. तुमची इच्छा शक्ती दांडगी आहे. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करतात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उत्साही आहे. वृत्ती संशोधक आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आशादायक आहे. तुम्हाला उत्तम भाषा चातुर्य आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि विश्लेषण करण्याची वृत्ती सूक्ष्म आहे.
व्यवसाय:- बौद्धिक, व्यवसाय, बँकिंग, सेल्स मॅनेजर, आयात निर्यात, पुस्तक विक्रेता, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरियर डेकोरेटर, वकील, डिपार्टमेंट स्टोअर्स, डॉक्टर, केमिस्ट, तंत्रज्ञ.
शुभ दिवस:- रविवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, नारंगी आणि निळा.
शुभ रत्न:- माणिक, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
Comments
Post a Comment