कै.पोपटबाई सोनमलजी निम्बजिया स्मृति
मॉ चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने नवकार चेस फाउंडेशनच्या वतीने श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर संघ, गुजरी महाद्वार रोड कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या माॅं चषक
खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात सुरू झाल्या.
संघवी शा.सोनमल वरदाजी,रूपाजी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांनी महेंद्र ज्वेलर्स परिवार प्रमुख स्वर्गीय श्रीमती पोपटबाई सोनमलजी निम्बजिया यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त या स्पर्धा पुरस्कृत केल्या आहेत.
स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेत बेळगाव , सातारा, रत्नागिरी, फलटण , सांगली , निपाणी, सिंधुदुर्ग व स्थानिक इचलकरंजी, जयसिंगपूर व कोल्हापूर येथील नामवंत 220 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. यापैकी 63 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.
नमोकार मंत्राने स्पर्धेची सुरुवात झाली . नवकार मंत्राचे महात्म्य परमपूज्य आचार्य भगवान महाराज यांनी सर्वांसमोर कथन केले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत मालार्पण करून करण्यात आले़.श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर संघ गुजरी कोल्हापूरचे ट्रस्टी, महेंद्र ज्वेलर्सचे देवीचंद ओसवाल,चंद्रकांत ओसवाल, भरत ओसवाल, महेंद्र ओसवाल, सौ मंजुळा ओसवाल, कांतीलाल संघवी, जयेश ओसवाल, रवी आंबेकर, मुख्य पंच मनीष मारुलकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सौ़.आरती मोदी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन झाल्यावर बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
आज झालेल्या स्पर्धेच्या सहाव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर, तृतीय मानांकित मिरजेचा मुदस्सर पटेल व पाचवा मानांकित सातारचा ओंकार कडव हे तिघेजण सहा गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत, चौथा मानांकित सातारचा अनिकेत बापट,सहावा मानांकित सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण, सातवा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार यांच्यासह प्रणव पाटील कोल्हापूर, वरद पाटील सांगली, शर्विल पाटील कोल्हापूर, संतोष कांबळे कोल्हापूर, सारंग पाटील कोल्हापूर, वेदांत बांगड इचलकरंजी, अथर्व चव्हाण कोल्हापूर, संतोष सरीकर इस्लामपूर, आदित्य कोळी सांगली, श्रेयस गाताडे कोल्हापूर, व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर व संतोष रामचंद्र कसबे डिग्रज हे पंधरा जण पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.
Comments
Post a Comment