पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
मा. खासदार संजयदादा मंडलिक, मा. आमदार संजयबाबा घाटगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व मा. पंचायत समिती उपसभापती भूषण पाटील यांची उपस्थिती
कोल्हापूर कागल, दि. २८ सिटी न्यूज नेटवर्क
कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज कागल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले व सहाय्यक निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व माजी उपसभापती भूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज सकाळी सहा वाजताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलचे ग्रामदैवत श्री. गहिनीनाथांचे दर्शन घेऊन तिथेच उमेदवारी अर्जावर सह्या केल्या. त्यानंतर श्री. राम मंदिर, हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर, साई मंदिर, लक्ष्मी मंदिर या कागल शहरातील देवतांचे दर्शन घेतले. मंत्री हसन मुश्रीफ यांचे मतदान नोंद असलेले लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर व नंतर आप्पाचीवाडी, ता. चिकोडी येथील श्री. हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले.
त्यानंतर सकाळी ११ वा. कागल बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून गैबी चौक मार्गे भव्य मिरवणुकीने निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळील येथे जाहीर सभा झाली. त्यानंतर अडीच वाजता मंत्री मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
Comments
Post a Comment