कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात प्रथमच रिपब्लिकन पक्षाने चार मतदार संघात विधानसभेचे उमेदवार मैदानात उतरवले

 कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात प्रथमच रिपब्लिकन पक्षाने चार मतदार संघात विधानसभेचे उमेदवार मैदानात उतरवले

रूपाताई वायदंडे


कोल्हापूर दि. ३० सिटी न्यूज नेटवर्क 

        रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी चार मतदारसंघातून पक्षाचे चार उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवून आजपर्यंतचा रिपब्लिकन पक्षाचा इतिहास रिपब्लिकन पक्षाने बदलला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय सरचिटणीस डॅा. मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने पक्षाने विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोल्हापूर उत्तर मध्ये पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे, कोल्हापूर दक्षिण मध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव तरटे, हातकणंगले राखीव मतदार संघामध्ये डॉ. गणेश वाईकर आणि कोल्हापूर च्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या करवीर विधानसभा मतदारसंघात, भारिप बहुजन महासंघातून पक्षामध्ये नुकतेच प्रवेशित झालेले  हरिभाऊ दत्तात्रय कांबळे यांना उमेदवारी देऊन पक्षाने व्यापकता सिद्ध केलेली आहे.

यापूर्वी केवळ हातकणंगले राखीव मतदार संघामध्ये रिपब्लिकन पक्ष लढत होता. उर्वरित मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्याचे काम रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरवादी जनता करत होती. आता मात्र चार उमेदवार निळा झेंडा हातात घेवून मैदानात उतरलेले आहेत. या विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या मतदानात केवळ 1000 ते 5000 मताधिक्याने उमेद्वार निवडून येणार किंवा पराभूत होणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे उमेदवार पाच हजार ते दहा हजार मते घेणार आहेत. राखीव मतदार संघामध्ये निश्चितपणे उमेदवार एक किंवा दोन नंबरच्या स्पर्धेत आहे. उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये रिपब्लिकन पक्षाचं प्रचंड मोठं काम आहे. यामध्ये पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या निवडणूक निरीक्षक रुपा वायदंडे या स्वतः निवडणूक लढत आहेत. महिलांच्या प्रश्नां संदर्भात केलेली अनेक आंदोलने, सामाजिक प्रश्नाच्या संदर्भात उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या आंदोलनामध्ये निर्णय भूमिका, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणामध्ये आंदोलनाची निर्णयाक भूमिका घेत, त्यांनी नेतृत्व केलेल्या भीमा कोरेगाव सारखा आंदोलनामध्ये त्यांनी चांगलीच भूमिका बजावलेली आहे. महिलांच्यावरील अन्याय अत्याचारा विरोधात रस्त्यावरील संघर्ष,  वीटभट्टी कामगार, उसतोड मजूर त्याचबरोबर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्यायी विळख्यातून महिलांची मुक्तता, उत्तर मतदारसंघात येणार्या अनेक झोपडपट्ट्यांशी थेट संपर्क, बेघरांना घरे मिळवून देण्यासाठीचा लढा यासारखी कितीतरी आंदोलन केल्यामुळे झोपडपट्टी, स्लम एरियातील जनतेबरोबर जिव्हाळ्याचं नातं तयार त्यांनी केलेलं असल्यामुळे कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातील निर्णयाक भूमिका त्या बजावतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केलेला आहे. जिल्हाध्यक्ष विश्वास तरटे हे गेली ३० वर्षे रिपब्लीकन पक्षाशी व रिपब्लीकन चळवळीशी संयुक्त आहेत. 

हातकणंगले राखीव मतदार संघाचे पक्षाचे उमेद्वार डॅा. गणेश वाईकर यांना कोणताहि राजकिय वारसा नसताना त्यांनी स्वतःची खूप चांगली राजकिय प्रतिमा तयार केली आहे. गोरगरीब जनतेशी त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जोडलेले आहेत.  एकंदरीत रिपब्लिकन पक्ष यावेळी जनतेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. केवळ एक जागा आणि तीही प्रचंड याचना करून मिळणार यापेक्षा स्वाभिमानाने चार जागा लढवल्या जातील हे संसदीय लोकशाही जिवंत ठेवणारं, भारतीय संविधान जिवंत ठेवणारं  एक आंदोलनच आहे ते रिपब्लिकन पक्ष नेटानं पूर्ण करेल असा विश्वास जनतेमधून व्यक्त होत आहे.

Comments