आदर्श प्रशालेत वाचन प्रेरणा दिन संपन्न

 आदर्श प्रशालेत वाचन प्रेरणा दिन संपन्न


कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क 

सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता सन्मानदिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. पी. सुतार यांनी केले . प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर ए .पी .जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

छावा संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता रवी लाड आणि पत्रकार राजेंद्र मकोटे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

राजेंद्र मकोटे यांनी आपल्या मनोगतात वाचनाने मनुष्य समृद्ध होतो यासाठी अनेक पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे असे नमूद करून काही वाचणीय पुस्तकांची नावेही सांगितली . वृत्तपत्र विक्रेता रवी लाड यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र वाटप कसे केले जाते याबाबत तसेच आपले जीवन समृद्ध करण्यासाठी कोणती पुस्तके वाचली पाहिजेत याबाबत काही पुस्तकांचे नावेही सांगितली .

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजू सावंत यांनी आदर्श प्रशालेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे असे आवाहन केले .

कार्यक्रमाचे आभार संगीता शिंदे यांनी मांनले .

Comments

Post a Comment