सक्रीय कार्यकर्त्यांनीच यापुढे कोल्हापूर चे नेतृत्व करणे काळाची गरज’: सज्जनशक्ती परिषदेचा सूर

 सक्रीय  कार्यकर्त्यांनीच यापुढे कोल्हापूर चे नेतृत्व करणे काळाची गरज’: सज्जनशक्ती परिषदेचा सूर       





     कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क 

‘योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती हवी. शहराच्या प्रश्नांची जाण आणि विकासाची दृष्टी लाभलेला लोकप्रतिनिधी विधानसभेत हवा. महापालिकेत अजित ठाणेकर यांनी अभ्यासू व जबाबदार नगरसेवक म्हणून छाप पाडली आहे. कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करणार्‍या अजित ठाणेकर यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी. आपण सारे एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी ताकत उभी करू.’ असा सूर सज्जनशक्ती जागरण परिषदेत उमटला.

समिधा प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी सायंकाळी मंगळवार पेठेतींल दैवज्ञ बोर्डिंग येथे कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होत. कोल्हापुरात वाढत चाललेला दुर्जन शक्तीचा प्रभाव आणि त्यामुळे होणारी कोल्हापूरची दुर्दशा थांबविण्यासाठी आणि कोल्हापुरातल्या सज्जन शक्तीला एकत्रित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती. प्रवचनकार सुहास लिमये प्रमुख वक्ते तर दैवज्ञ बोर्डिंग चे माजी अध्यक्ष एकनाथ चोडणकर, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष किरण सांगावकर, सनदी लेखापाल सतिश डकरे, बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष अ‍ॅड.प्रशांत देसाई, उद्योजक अभय देशपांडे आणि डॉ. रामचंद्र लिमये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 यावेळी मुख्य मार्गदर्शन करताना सुहास लिमये यांनी गीता, ज्ञानेश्वरी आणि संत साहित्यातील अनेक दाखले देत सज्जनशक्ती एकत्र येण्याची गरज अधोरेखीत केली.‘समाज समाधानी, आनंदी राहण्यासाठी सज्जनशक्ती एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रप्रथम ही भावना, उच्च विद्याविभूषित, निष्कलंक चारित्र्य, पक्षावरील निष्ठा, शहर विकासाची तळमळ, लोकांमध्ये राहून काम करण्याची वृत्ती यामुळे अजित ठाणेकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला योग्य पद मिळायला हवे.’ असे उद्गार त्यांनी काढले. दैवज्ञ बोर्डिंगचे माजी अध्यक्ष एकनाथ चोडणकर म्हणाले, ‘अजित ठाणेकर यांच्या व्यक्तिमत्वात कर्तृत्व, दातृत्व व वक्तृत्वाचा मिलाफ आहे. 

अ‍ॅड. प्रशांत देसाई म्हणाले, ‘कोल्हापुरातील प्रश्नांची उकल आणि सोडवणूक होण्यासाठी ठाणेकर हे विविध व्यासपीठांच्या माध्यमातून काम करत आहेत. लोकांना सोबत घेऊन त्यांची वाटचाल आहे.’ अभय देशपांडे, डॉ. रामचंद्र लिमये,  किरण सांगावकर, सीए सतीश डकरे यांनीही यावेळी कोल्हापूर च्या बिघडत चालेलेल्या परिस्थितीवर आपली मनोगते व्यक्त करून कोल्हापूर ला बदलाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. समिधा प्रतिष्ठान चे अध्यक्ष अजित ठाणेकर म्हणाले, ‘चांगल्या कार्यासाठी सार्‍यांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी ही परिषद एक सुरूवात आहे .सज्जनशक्ती संघटीत झाली तर दुर्जनशक्ती चा त्यापुढे टिकाव लागत नाही ' असे नमूद केले केले

माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. कविता बंकापुरे यांनी सूत्रसंचलन केले तर आभार ओंकार गोसावी यांनी मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रदीप उलपे, ब्राह्मण सभेचे डॉ. उदय कुलकर्णी, पंचगंगा बँकेचे संचालक राम टोपकर, दिपक फडणीस, जयंत हरळीकर, सचिन जनवाडकर, नितीन वणकुद्रे, मनोज प्रसादे, मुकुंद भावे, श्रीकांत पोतनिस, दिलीप मैत्राणी, किरण तासगांवकर, प्रताप देसाई, सुदर्शन सावंत, कपिल भूयेकर, केदार वाघापुरकर, सुरजसिंह चव्हाण, अशोक लोहार, अशोक कोळवणकर, अशोक रामचंदानी, रश्मी साळोखे, दीपा ठाणेकर, अमृता खाडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपा आणि रा.स्व.संघाचे कार्यकर्ते, विविध ब्राह्मण समजा संघटनांचे पदाधिकारी, समाजातील विविध घटकांतील नागरिक आणि लक्षणीय संख्येने महिलांची उपस्थिती होती.

Comments