श्री चैतन्य टेक्नो स्कूल, बावधन च्या विद्यार्थ्यांचा “सुपर हॅट-ट्रिक वर्ल्ड रेकॉर्ड”मध्ये सहभाग
पुणे २६ सिटी न्यूज नेटवर्क
श्री चैतन्य टेक्नो स्कूल, बावधनचे विद्यार्थी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी बावधन, पुणे येथे होणाऱ्या मॅथ फॉर्म्युला पाठांतर वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग घेतल्यामुळे यावेळी “सुपर हॅट-ट्रिक” होणार आहे.
यावर्षी, शाळा ६०० गणितीय सूत्रे म्हणजेच फॉर्म्युला लक्षात ठेवून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. हे विद्यार्थी मुख्यत्वे बावधन कॅम्पसच्या प्राथमिक विभागातील आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी नर्सरी ते ५ वी इयत्तेतील आहेत आणि मॅव्हरिक्स विभागाचा भाग आहेत. या वर्ल्ड रेकॉर्ड प्रयत्नाद्वारे श्री चैतन्य स्कूलचा वेगळा दृष्टिकोन ठळकपणे दिसून येतो.
१९८६ साली स्थापन झालेली श्री चैतन्य स्कूल लहान वयातच विद्यार्थ्यांना विविध उपक्रम आयोजित करून स्पर्धात्मक भविष्यासाठी तयार करते. लहान वयात कठीण सूत्रे आणि गणितीय संकल्पना लक्षात ठेवणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, आणि समर्पण निर्माण करते.
श्री चैतन्य स्कूलच्या प्राचार्या रेणुका जोशी यांनी या वर्ल्ड रेकॉर्ड प्रयत्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या तयारीला ब्रांच हेड अनिता के , झोनल कोऑर्डिनेटर रमया आर, इनचार्ज अनुशा कौल आणि मॅव्हरिक्स विभागातील शिक्षकांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे.
Comments
Post a Comment