सबज्युनिअर (पंधरा वर्षाखालील) कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत जांभळीचा अभय भोसले व नांदणीची संस्कृती सुतार अजिंक्य

 सबज्युनिअर (पंधरा वर्षाखालील) कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत जांभळीचा अभय भोसले व नांदणीची संस्कृती सुतार अजिंक्य तर कोल्हापूरच्या राजदीप पाटील व नांदणीच्या सिद्धी बुबणेला उपविजेतेपद



 कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

भीमा हेल्थ झोन (शाहू जलतरण तलाव) माळी कॉलनी, टाकाळा येथे अनयाज् चेस क्लब ने आयोजित केलेल्या सबज्युनिअर (पंधरा वर्षाखालील) कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.  

 चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या मुलांच्या गटात अंतिम सहाव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित जांभळीच्या अभय भोसलेने सहा पैकी सहा गुण मिळवून निर्विवादपणे अजिंक्यपद पटकाविले. सातवा मानांकित राजदीप पाटील कोल्हापूर, अग्रमानांकित व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर व पाचवा मानांकित अरिन कुलकर्णी कोल्हापूर या तिघांचे समान पाच गुण झाले होते. बखोल्झ टायब्रेक गुणानुसार राजदीप पाटीलला उपविजेतेपद मिळाले. तर व्यंकटेश खाडे पाटील व अरिन कुलकर्णीला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या गटात अंतिम पाचव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित नांदणीची संस्कृती सुतार ने साडेचार गुणासह अजिंक्यपद पटकाविले. तृतीय मानांकित नांदणीची सिद्धी बुबने व बिगरमानांकित नांदणीची अनया व्हनवाडे या दोघींचे समान चार गुण झाल्यामुळे बखोल्स टायब्रेक गुणाानुसार सिद्धी बुबने ला उपविजेते पद मिळाले तर अनया व्हनवाडे ला तृतीय स्थान मिळाले. अग्रमानांकित कोल्हापूरची अरिना मोदीने साडेतीन गुणासह चौथे स्थान ग्रहण केले. आरोही बनसोडे कोल्हापूर व निरजा शेलार कोल्हापूर या दोघी तीन गुणासह  अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आल्या.

 स्पर्धेचा बक्षीस समारंभ सेंट्रल जीएसटीचे असिस्टंट कमिशनर सबरीश पिलाई, श्रीमती विजया पामलानी, ए.के. कुलकर्णी, उद्योजक अरुण पाटील, उमेश पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर अनयाज चेस क्लबचे मनिष मारुलकर, चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी, स्पर्धेच्या मुख्य पंच आरती मोदी,प्रशिक्षक उत्कर्ष लवटे व अभिजीत चव्हाण उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज महाडिक व कृष्णराज महाडिक यांचे या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले.

18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा चार मुलांचा व सहा  मुलींचा निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे 

 मुले 

1) अभय भोसले जांभळी  2) राजदीप पाटील कोल्हापूर 3) व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 4) अरीन कुलकर्णी कोल्हापूर 

 मुली

1) संस्कृती सुतार नांदणी  2) सिद्धी बुबणे नांदणी  3) अनया व्हनवाडे नांदणी  4) अरीना मोदी कोल्हापूर  5) आरोही बनसोडे कोल्हापूर  6) निरजा शेलार कोल्हापूर 

 उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढील प्रमाणे

 सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 मुले  :- 1) अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर   2) अथर्वराज ढोले कोल्हापूर 

 मुली:- 1) मीनाक्षी पिलाई कोल्हापूर 

नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 मुले  :- 1) वन्शिल ठक्कर कोल्हापूर  2) कैवल्य राज्याज्ञ कोल्हापूर 

 मुली :- 1) ग्रीष्मी पवार कोल्हापूर 

 अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 मुले:- 1) आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी  2) आदित्य ठाकूर अतिग्रे 

 मुली :- 1) आराध्य सावंत कोल्हापूर  2) शरयू शिंदे कोल्हापूर 

 तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 मुले :- 1) सर्वेश पोतदार कोल्हापूर 2) वेदांत देसाई कोल्हापूर 

 मुली:- 1) तन्वी पाटील कोल्हापूर   2) दीक्षा पाटील गडहिंग्लज

 सर्व निवड झालेल्या व इतर उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांना एकूण रोख पाच हजार रुपये व चषक आणि मेडल्स घेऊन सन्मानित केले.

Comments