कोल्हापूर जितोचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर जितोचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न 



कोल्हापूर, ता. १७ सिटी न्यूज नेटवर्क 

 प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करा, असे प्रतिपादन जितो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले.

हॉटेल सयाजी येथे जितो कोल्हापूर चॅप्टरची   सन २०२४ - २६ या सालाकरिता नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भंडारी बोलत होते.

ते म्हणाले, जितो संघटनेचे कार्य जगभरातील 29 देशांत, भारतात 71 शहरांत आहे.  सर्वसामान्य लोकांना मोठे बनविणारी संस्था आहे. सेवा, समृद्धी आणि आर्थिक सुदृढता या तीन प्रमुख उद्दिष्टांना समोर ठेवून काम करण्यासाठी जितोचा मोठा फ्लॅटफ़ॉर्म आपणासमोर आहे. 11 प्रकल्प सुरू आहेत  

ते म्हणाले, जितोच्या विविध माध्यमातून प्रत्येकाला समाजासाठी काम करता येईल. सर्वांच्या सहयोगातून जितो आवास योजना, गर्ल्स आणि ब़ॉईज ह़ॉस्टेलबरोबर बिझनेस स्कूलचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल.

यावेळी संजय घोडावत, गिरीश शहा, अनिल पाटील, जितेंद्र राठोड, नेमिचंद संघवी, रवी संघवी आदीनी मार्गदर्शन केले.  

दरम्यान, अध्यक्ष पदाकरिता तीर्थ डेव्हलपरचे चेअरमन रवी  संघवी व एसपी वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील यांची चिफ सेक्रेटरीपदी  निवड झाली. व्हॉईस चेअरमनपदी राजू पारीख, रमण संघवी,  ट्रेझररपदी सीताराम कोरडे  यांच्यासह जितोच्या यूथ विंगच्या चेअरमपदी प्रतीक ओसवाल, चीफ सेक्रेटरी पुनित कोठारी व लेडिज विंगच्या चेअरमनपदी माया राठोड, चीफ सेक्रेटरी स्विटी पोरवाल व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

संघटनेचे नवीन प्रमुख प्रेसिडेंटपदी विजय भंडारी यांची निवड झाली. रोम चेअरमनपदी राजेंद्र जैन यांची निवड झाली. 

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, महेंद्र ज्वेलर्सचे चंद्रकांत ओसवाल, चार्टर्ड अकौंटंट सुनील नागावकर, अरुण ललवाणी, विजय ककडे, अतुल शहा, इचलकरंजी, बेळगावच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने जितोचे सदस्य उपस्थित होते. जान्हवी जैन यांनी सूत्रसंचालन केले. शीतल कोरडे यांनी आभार मानले.

Comments