प्रणव मोरे बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य.
कोल्हापूर 23 सिटी न्यूज नेटवर्क
दि 23 नोव्हेंबर रोजी अनुज् चेस अॅकॅडमीच्यावतीने डॉ डी वाय पाटील विद्यानिकेतन स्कूल व इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या शालेय 15 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 5 फेऱ्या घेण्यात आल्या. प्रणव मोरे याने 4.5 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. सर्वेश पोतदार याने 4.5 गुण (प्रोग्रेसिव्ह) मिळवून उपविजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन अॅस्टर आधार हाॅस्पीटलचे आॅडीओलाॅजीस्ट संग्राम निकम व राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू अनुष्का पाटील यांचे हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.
स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे
तृतीय क्रमांक अर्नव पोर्लेकर 4 गुण (प्रोग्रेसिव्ह)
चौथा क्रमांक निरंजन पोवार 4 गुण (प्रोग्रेसिव्ह)
पाचवा क्रमांक शिवराज भोसले 4 गुण
15 वर्षाखालील इतर विजेते
9 वर्षाखालील
प्रथम क्रमांक दक्श पाटील 2 गुण
द्वितीय क्रमांक अनुजा खानविलकर 1 गुण
11 वर्षाखालील
प्रथम क्रमांक श्रीतेज भाट 3 गुण
द्वितीय क्रमांक आरोही बनसोडे 3 गुण
13 वर्षाखालील
प्रथम क्रमांक भाग्यवंत आक्कोळकर 3 गुण
द्वितीय क्रमांक दीप चव्हाण 3 गुण
अनुज् चेस अकॅडमी विजेते
प्रथम क्रमांक वेदराज चव्हाण 3 गुण
द्वितीय क्रमांक पृथ्वीराज गुरव 3 गुण
तृतीय क्रमांक आराध्या सावंत 3 गुण
चौथा क्रमांक आयुश पाटील 3 गुण
पाचवा क्रमांक मोहीत जाधव 2 गुण
स्पर्धेमध्ये एकूण 33 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री बाबूराव पाटील यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण श्री संतोष अकोळकर व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव श्री कृष्णात पाटील आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मा. आम बंटी पाटील साहेब, मा. आम रूतुराज पाटील साहेब व डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर चे प्रिंसीपल डॉ सुरेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शशिकांत कबनूरकर, अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment