आमच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान करा ः शालेय विद्यार्थ्यांची मतदारांना साद
कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हावे यासाठीआदर्श प्रशाला शिवाजी पेठ, मॅगो एफ एम, जायन्टस् ग्रुप रंकाळा चौपाटी, भारतीय क्रिडा व सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने मतदान जनजागृती सामुदायिक शपथ शिवाजी पेठ जुना वाशी नाका चौक येथे घेण्यात आली .
यावेळी "आमच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान करा' "मतदान ही एक संधी आहे योग्य उमेदवार निवडण्याची ' माझा अभिमान माझे मतदान' मतदार राजा जागा हो - लोकशाहीचा धागा हो अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी सर्व मतदार आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी मुख्याध्यापक आर. वाय. पाटील यांनी प्रास्ताविकात सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी सर्व विद्यार्थी वर्गाने आपल्या पालक आणि परिचितांना मतदान करण्यासाठी आग्रहाने सांगावे असे सांगितले. यावेळी मतदान हक्क बजावण्याची सामुदायिक शपथ राजेंद्र मकोटे यांनी सर्वाना दिली. यावेळी दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या मतदान आवाहन करणारे विशेष अंकाचे प्रकाशन छावा संघटनेचे राजू सावंत, बाबा महाडिक, जायन्टस् ग्रुप रंकाळा चौपाटीच्या बबिता जाधव, माधुरी भोसले-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व त्याचे वितरणही करण्यात आले. या वेळी आर.बी.माने, ए.के.देसाई, सौ.एस.एस.शिंदे यांच्यासह पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे, सचिव अनिता वाळके, उपाध्यक्षा उर्मिला भोसले, अनिता काळे, कमल पाटील, अनिल निगडे सागर ठाणेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment