शहीद सिताराम पाटील यांना अभिवादन :तिटवे येथे शहीद सन्मान दिन साजरा

 शहीद सिताराम पाटील यांना  अभिवादन :तिटवे  येथे शहीद सन्मान दिन साजरा 



कोल्हापूर (तिटवे) २५ : सिटी न्यूज नेटवर्क 


        25 नोव्हेंबर 1971 रोजी भारत -पाकिस्तान युद्धात  शहीद सीताराम पाटील यांना वीरमरण आले होते. हा दिवस शहीद शिक्षण प्रसारक मंडळा तर्फे 'शहीद सन्मान दिन' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई सिताराम पाटील होत्या.

    

    या वेळी शाहीर अलीम कासार आणि सहकार्यांचा  देशभक्तीपर शाहीरी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.  विविध पोवाड्यांतून रणभूमीची गाथा ऐकायला मिळाली. शहीद सन्मान, देशभक्ती,एड्स जागरूकता,आजची तरुणाई आणि सोशल मीडिया,पर्यावरण वाचवा,महिला सक्षमीकरण अशा विषयांवर पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा संपन्न झाल्या. ह्या स्पर्धेमध्ये स्नेहल पाटील प्रथम, निलम मोरे द्वितीय आणि पायल रानमाळे हीला तृतीय पारितोषिक मिळाले.

             भारत-पाकिस्ताच्या युद्धात शहीद सिताराम पाटील यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. समाजासाठी आणि देशासाठी त्याग करण्याची त्यांची शिकवण घेऊनच संस्था कार्यरत आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी व्यक्त केले.


      कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस विभागाने केले होते. सूत्रसंचालन प्रा. दिग्विजय कुंभार यांनी केले तर आभार प्रा.अविनाश पालकर यांनी मानले.यावेळी आजी-माजी सैनिक ,अशोक फराकटे,तिटवे गावचे पोलीस पाटील वसंत पाटील, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील पाटील, सचिव दिलीप देसाई, विश्वस्त अनिल पाटील,उपप्राचार्य सागर शेटगे,शिक्षकवृंद,विद्यार्थिनी,तिटवे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments