कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

 

कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात  शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री.अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले..

यावेळी खासदार धनंजय महाडिक, निवडणूक निरीक्षक अशोक कुमार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्निल रावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आदी उपस्थित होते.

     कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम मशीनच्या 24 फेऱ्या तसेच टपाली व गृहमतदानाची मतमोजणी करण्यात आली. ही सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी उमेदवार झाल्याचे घोषित करण्यात आले.

       

Comments