रिलायन्सच्या हॅमलीज ब्रँडचे इटलीमध्ये चौथे स्टोअर
• ख्रिसमसच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास भेट
• कंपनीचे 14 देशांमध्ये 190 स्टोअर्स
पोम्पेई, इटली, १८ सिटी न्यूज नेटवर्क
ख्रिसमसच्या निमित्ताने नेपल्स आणि कॅम्पेनियातील ग्राहकांसाठी हॅमलीजने खास भेट दिली आहे. भारतातील सर्वात मोठ्या रिलायन्स कंपनीशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळण्यांच्या ब्रँड हॅमलीजने नवीन मॅक्सिमॉल-पोम्पेई, टोरे अन्नुन्झियाटामध्ये आपले स्टोअर लाँच केले आहे. रोम, मिलान, आणि बर्गामो नंतर इटलीतील हे हॅमलीजचे चौथे स्टोअर आहे.
750 चौरस मीटरमध्ये विस्तारलेल्या या स्टोअरची उभारणी आघाडीचे खेळणी उत्पादक आणि वितरक जिओची प्रीजिओसी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. नेपल्समधील या स्टोअरमध्ये ग्राहक, विशेषतः लहान मुले, हॅमलीजच्या आवडत्या पात्रांद्वारे स्वागताचा आनंद घेऊ शकतील. यात हॅमलीजचे लोकप्रिय खेळणे, जसे की हॅटी बिअर, सर्कस रिंगमास्टर, खेळणी सैनिक, आणि बाहुल्या यांचा समावेश आहे.
या प्रसंगी हॅमलीजचे सीईओ सुमीत यादव म्हणाले, “आम्हाला आमच्या इटालियन स्टोअर्सची जादू पसरताना पाहून खूप आनंद होत आहे. हे नवीन स्टोअर जगभरातील मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. जिओची प्रीजिओसी (जीपी ग्रुप) यांच्यासोबतचे आमचे सहकार्य दिवसेंदिवस मजबूत होत आहे.”
हॅमलीजची स्थापना 1760 साली विलियम हॅमली यांनी केली होती, आणि 2019 साली रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (RBL) यांनी त्याचा ताबा घेतला. सध्या 14 देशांमध्ये हॅमलीजची 190 स्टोअर्स आहेत. यूके व्यतिरिक्त, हॅमलीज इतर नवीन बाजारपेठांमध्येही आपल्या विस्ताराला चालना देत आहे. अलीकडेच रोम, शारजाह (यूएई), मिलान, तिराना, प्रिस्टिना, आणि दोहा येथे स्टोअर्स उघडण्यात आले आहेत. मॅक्सिमॉल पोम्पेई येथे हॅमलीज स्टोअर अधिकृतपणे 14 डिसेंबर रोजी खुले होणार आहे.
Comments
Post a Comment