हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक ! - प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी



हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक - प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी




कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क 

 भारतात लाखो मंदिरे आहेत आणि त्यांचे वेगवेगळे भक्त आहेत. आपण जरी वेगवेगळे असलो, तरी जेव्हा देवासमोर येते तेव्हा आपण आपल्यातील वेगळेपण विसरून एकत्र येतो. त्याचप्रकारे हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक आहे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी यांनी केले. श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. दादा महाराज, डॉ. सूर्यकिरण वाघ, राजवाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. संजीवकुमार झाडे उपस्थित होते. 


प्रास्ताविक धर्मजागरण मंचचे श्री. सचिन पोवर यांनी केले, तर आभार श्री. सनतकुमार दायमा यांनी व्यक्त केले. या प्रसंगी धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी असणार्‍या विविध मान्यवरांचा स्वामिजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक श्री. अजित ठाणेकर, श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे,  ह.भ.प. अनिल यादव महाराज, अधिवक्ता केदार मुनीश्‍वर, प्रमोद पावले, रवी मिसाळ, प्रणव भिवसे, माधव कुंभोजकर, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, बापू महाराज यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.


यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या महाद्वारासमोर श्री रेणुकामाता दर्शन रथासमोर संत आणि मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. या रथात देवीची अलंकारिक वस्रे, परशुराम कुंडातील जल, टाक आणि तीर्थाचा कलश असणार आहे.

श्री अंबाबाई मंदिरातून सकाळी 10.30 वाजता शुभारंभ झालं आणि देवीचा रथ पुढे लक्षतिर्थ वसाहत, वारे वसाहत, राजारामपुरी, सदर बाजार, कनान नगर, रमणमळा, कसबा बावडा मार्गे पुढे कसबा सांगावं कडे मार्गस्थ झाला....

शहरात रथाचे भाविकांनी जल्लोशात स्वागत केले उद ग बाई उद रेणुका देवीचा उद अश्या जायघोष भक्तांनी केला...विविध ठिकाणी स्वागत कमानी व बोर्ड लावण्यात आले होते .. रथावर फुलांचा वर्षाव करत अनेक भाविकांनी दर्शन घेतले...

Comments