छत्रपती शिवाजी विद्यापीठाला चेस क्लब व बुद्धिबळाच्या अभ्यासक्रमाबाबत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा प्रस्ताव सादर

 छत्रपती शिवाजी विद्यापीठाला चेस क्लब व बुद्धिबळाच्या अभ्यासक्रमाबाबत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा प्रस्ताव सादर



 कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आज राज्यपाल नियुक्त मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य  श्री सिद्धार्थ शिंदे व मेजर ध्यानचंद जीवन गौरव क्रीडा व खेल पुरस्कार विजेते महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयात चेस क्लब व बुद्धिबळ अभ्यासक्रमाचा प्रस्ताव आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांना सादर करण्यात आला.

 यावेळी शिवाजी विद्यापीठात विविध स्वरूपात बुद्धिबळ खेळाचा विकास करण्याबाबत व अभ्यासक्रमाबाबत बुद्धिबळ ऑलिंपियाड मध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य  श्री सिद्धार्थ शिंदे व कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यात शिवाजी विद्यापीठ व विविध कॉलेजमध्ये चेस क्लब त्याचबरोबर बीए स्पोर्ट, बीपीएडी, एमपीएड, बीएड, एमएड च्या अभ्यासक्रमात कशा पद्धतीने समावेश करता येईल याबाबत व्यापक चर्चा झाली.बुद्धिबळामुळे एकाग्रता,संयम, स्मरणशक्ती,दूरदृष्टी, आत्मविश्वास  नियोजन व संयोजन कौशल्य वाढण्यास मदत होते.. बौद्धिक व मानसिक विकास होतो.. त्याचबरोबर विश्लेषण क्षमता व गणिती कौशल्य सुधारते जेणेकरून विद्यार्थ्यांच्यामध्ये सर्वांगीण विकास होवून शैक्षणिक दर्जा वाढण्यास मदत होईल व पर्यायाने विद्यार्थी देशाचे सजग व सुजाण नागरिक बनून समृद्ध राष्ट्रवाढीस गती मिळेल असे श्री सिद्धार्थ शिंदे म्हणाले... या दृष्टीने  सकारात्मक चर्चा झाली.. कुलगुरूंनी याबाबत अनुकूलता दर्शवीत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने अमलात आणण्यासाठी सहकार्य करुन पाठपुरावा करावा असे आवाहन केले. शिवाजी विद्यापीठाने हा प्रस्ताव मंजूर केला व अभ्यासक्रम स्विकारला तर शिवाजी विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरेल असे ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे,चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य व कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी उपस्थित होते.

Comments