श्री रेणुका माता दर्शन रथयात्रेचा कोल्हापूरात शुक्रवारपासून शुभारंभ
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
श्री रेणुका माता दर्शन रथयात्रा शुक्रवार (दि.२०) ते रविवार (दि.२९) या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व भागात निघणार आहे. धर्मजागरण ट्रस्ट तर्फे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रथयात्रेचा शुभारंभ शुक्रवारी (दि २० ) सकाळी 10:30 वाजता करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातून होणार आहे. श्री रेणुका मातेचे भक्त जिल्ह्याच्या सर्व भागात आहेत. सौंदत्तीच्या डोंगरावररेणुका मातेची यात्रा होते. अनेक भक्तांना इच्छा असूनही यात्रेमध्ये सहभागी होता येत नाही. अशा भक्तांसाठी धर्म जागरण ट्रस्टने रेणुका माता दर्शन स्थयात्रेचे आयोजन केले आहे. यात्रेमध्ये असणाऱ्या रथात देवीची अलंकारिक वस्त्रे, टाक आणि तीर्थाचा कलश असणार आहे. यात्रेच्या मार्गावरील नियोजित वस्त्यांमध्ये स्थ जाईल. तेथे भाविकांना मनोभावे रथाचे पूजन करता येईल. या यात्रेच्या निमित्ताने श्री रेणुका माता भक्तांच्या घरी येणार आहे. या निमित्ताने सर्व भागात मातेच्या भक्ताचा जागर करण्याची संधी भाविकांना उपलब्ध झाली आहे. रथयात्रेचा समारोप इचलकरंजी मधील खवरे मैदानावर रविवारी (दि.२९) संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. त्याआधी इचलकरंजी शहरात महिलांची कलश यात्राही निधणार आहे. यात्रेच्या समारोपाप्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, प.पू.ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, प.पू. बाळ महाराज, प.पू.दादा महाराज, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या रथयात्रेला आपल्या लोकप्रिय दैनिकातून आणि वृत्तवाहिनीवरून प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
या पत्रकार परिषदेला रथयात्रेचे जिल्हा संयोजक चंद्रकांत शिंदे, सहसंयोजक संतोष पाटील, बापू वायंगणकर, सनतकुमार दायमा, प्रमोद पावले, प्रणव रजपूत, मनोज जाधव, रवी मिसाळ, प्रणव भिवसे, माधव कुंभोजकर, संभाजी गुरव, लखन पोवार, सचिन पोवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशी असेल रथयात्रा
शुक्रवारी (ता.20) श्री अंबाबाई मंदिरातून सकाळी 10.30 वाजता शुभारंभ. तेथून लक्षतिर्थ वसाहत, वारे वसाहत, राजारामपुरी, सदर बाजार, कनान नगर, रमणमळा, कसबा बावडा.
शनिवार (ता.21): कसबा सांगाव, मौजे सांगाव, कागल बेघर वसाहत, पिंपळगाव, व्हंतुर
रविवार (ता.22): सांगवडे, वसगडे, गांधीनगर, उचगांव, वाशी, शिंगणापूर.
सोमवार (ता.23): आसुर्ले, पोलें, केर्ली, आपटी, जेऊर, देवाळे, पैजारवाडी.
मंगळवार (ता.24) : बोरपाडळे, आरळे, सातवे, मोहरे, काले कोडोली.
बुधवार (ता.25) : तळसंदे, किणी, वाठार, भादोले, मिणचे, सावर्डे, कुंभोज.
गुरुवार (ता. 26) : कवठेसार, दानोळी, कोथळी, उमलवाड, शिरोळ, औरवाड, कुरुंदवाड, हेरवाड
शुक्रवार (ता.27) : अब्दुललाट, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, रुई, पट्टणकोडोली.
शनिवार (ता. 28) : शिरोली, हालोंडी, चोकाक, रुकडी, हातकणंगले, तारदाळ, कोरोची.
रविवार (ता.29): रेणुका मंदिर, लाल नगर, नेहरूनगर, जय भिम नगर, कामगार चाळ, खवरे मैदान.
Comments
Post a Comment