सतेज कृषी व पशू प्रदर्शनाची सांगता : चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची विक्रमी विक्री

  सतेज कृषी व पशू प्रदर्शनाची सांगता :  चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची  विक्रमी  विक्री





कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात ८ लाख  शेतकरी, नागरीक व  ग्राहकांनी भेट दिली. आणि शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो.हा प्रतिसाद पाहून आणि शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेती साठी लागणारे साहित्य आणि माहिती मिळावी या उद्देशानेच आमदार सतेज पाटील यांनी या कृषी प्रदर्शनास सुरुवात केली यावर्षी २०२४ सालचे प्रदर्शन हे सहावे प्रदर्शन आयोजित केले होते.आज शेवटच्या दिवशी सोमवारी  तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता.चार दिवसात  तांदळाची उंच्चांकी विक्री  झाली  असून ६० लाखांपेक्षा अधिक  उलाढाल ही तांदूळ मधून झाली आहे.महिलां बचत गटांच्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून  ५० लाखांची उलाढाल  झाली आहे.तर शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.  सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात  तब्बल ९ कोटीची उलाढाल  झाली आहे. विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी  झाली आहेत.

      शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गेली ५ वर्षांपासून  या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली.यावर्षीचे हे ६ वे  प्रदर्शन २७ डिसेंबर रोजी सुरू झाले आज याची ३० डिसेंबर रोजी  सांगता अभूतपूर्व गर्दीत झाली.

  चार दिवसात कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,कोकण इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण  भागातील शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी  केली होती.सतेज कृषी प्रदर्शन यावर्षीचे प्रदर्शनाचे सहावे वर्ष असून

देश-विदेशातील विविध नामांकित  कंपन्यांचे अडीचशे हून अधिक स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यां सहभागी झाल्या होत्या.त्या कंपन्यांची उत्पादने, अन्य पशुपक्षी,जनावरे, विविध शेतीला लागणारी  अवजारे, बी बियाणे, खते प्रदर्शनात  शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला, विदेशी भाजीपला,फुले,

मातोश्री फार्म हाऊस गिरगाव फाटा येथील जितेंद्र पाटील यांचा चारदाती १२६० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. शिवाय कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाचे बोकड, वर्षाला ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी प्रदर्शनाचे ठरत आहे.याचबरोबर गडहिंग्लज येथील हसुरचंपू गावातील स्वप्निल पवार यांचा तेराशे १३६० किलो वजनाचा युवराज रेडा याचबरोबर विदेशी भाजीपाला जुकेनिया काकडी,कागल येथील फुटबॉल आकाराचा पपई,नागदेववाडीतील २५ किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा,लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी,नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध,बेले येथील ९७८ वान असलेला दोडका प्रदर्शनाचे ठरले.विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी,गडहिंग्लज येथील आनंदा  कानडे यांची कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची खास आकर्षण ठरले हे सर्व पाहण्यासाठी तपोवन मैदानावर तुफान गर्दी केली होती. शिवाय याठिकाणी मोठ्या प्रमाणात मसाले, जाम, उडीद नाचणी, हळद, विविध प्रकारचा तांदूळ, शेतीविषयक साहित्य बी बियाणे यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली शिवाय शेतकऱ्यांसह अबाल वृद्धांनी अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला.


समारोप प्रसंगी प्रकल्प संचालक जालिंदर पांगीरे, आत्मा प्रमुख रक्षा शिंदे पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद प्रमोद बाबर, गोकुळ संचालक बाबासो चौगुले, सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील, शेतकरी नेतृत्व बाबासाहेब देवकर, कृषी विकास केंद्र समन्वयक जयवंत जगताप,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुयोग वाडकर, डॉ,सुनील काटकर, बिद्री कारखाना संचालक आर.एस.कांबळे,कृषी प्रदर्शन संयोजक विनोद पाटील, सहयोगी संशोधन संचालक (एनएआरपी).डॉ.अशोक पिसाळ आदींच्या उपस्थितीत हस्ते विजेत्यांचा  प्रशस्तीपत्र व ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.




चॅम्पीयन ऑफ द शो

स्वप्निल अशोक पवार हसुरचंपू राहणार गडहिंग्लज कोल्हापूर यांचा युवराज मुरार जातीचा रेडा हा चॅम्पियन ऑफ द शो ठरला आहे.



*आदत खिल्लार खोंड*


1 तानाजी रामचंद्र पाटील कोतोली  पहिला क्रमांक

2 सिद्धार्थ शंकर पाटील बेलवळे बुद्रुक तालुका कागल द्वितीय

3 धनाजी विश्वास पाटील मौजे सांगाव कागल  तृतीया


*दोन दाती खिलार खोंड*


1 सागर विलास पाटील नेर्ली तालुका करवीर प्रथम क्रमांक 

2 वैभव आनंदा पोटले आप्पाचीवाडी निपाणी बेळगांव द्रुतीय

3उमेश नामदेव केसरकर चांदेकरवाडी राधानगरी तृतीय


*चारदाती खिलार खोंड*


1 नितिन आरगोंडा पाटील नेर्ली करवीर प्रथम

2. सतिश आप्पासो हांडे हुपरी हातकणंगले दृतीय

3 सुयश बाजीराव बरेकर दिंडनेरली तालुका करवीर तृतीय


*अदात खिलार कालवड*


1 तुषार सुजय वळगडे काडगावं प्रथम क्रमांक

2 दर्शन सागर पाटील नेर्ली तालुका करवीर दृतीय 

3 गोपी रामचंद्र कोळसे हुपरी तालुका हातकणंगले तृतीय

चॅम्पियन ऑफ द शोस

स्वप्नील अशोक पवार हसुरचंपु गडहिंग्लच प्रथम

*दोन दाती खिलार कालवड*

1 सुजल सुजय भोजकर रांगोळी हातकणंगले प्रथम

2 संजय केरबा गवळी बोंद्रेनगर तालुका करवीर दृतीय

3 सुमित सर्जेराव पाटील मौजे सांगावं कागल कोल्हापूर तृतीय


 *चार दाती खिलार कालवड*


1 शिवाजी महादेव भोसले नृसिंहवाडी शिरोळ प्रथम क्रमांक

2  चंद्रकांत अशोक शिरोळे तळंदगे हातकणंगले दृतीय 

3 संतू दिनकर शेळके सातार्डे पन्हाळा तृतीय


*खिलार गाय*


1 रघुनाथ कृष्णात पाटील मौजे सांगावं कागल प्रथम क्रमांक

2 सुरज तमन्ना गुरव हुपरी हातकणंगले दृतीय

3 अश्विनी सुरज पाटील टिटवे तालुका राधानगरी तृतीय


*मुऱ्हा रेडा*


1 इंद्रजित जितेंद्र पाटील कळंबा गिरगाव तालुका करवीर प्रथम क्रमांक

2 प्रकाश निवृत्ती नगराळे ढोनेवाडी ता निपाणी बेळगांव दृतीय 

3 काकसो भरमा हळीज्वाळे करनुर कागल तृतीय


*जाफरी रेडा सुधारित*


1 प्रभाकर शिवलिंग पाटील हंकिरे चंदगड प्रथम

2 प्रज्वल जयंत थडके लिंगणुर दुमाला कागल दृतीय

3 सोहेल सय्यदअली पटेल बस्तवाड शिरोळ तृतीय


*कांक्रेज गाय*


1 धनाजी पांडुरंग पाटील तिटवे राधनागरी प्रथम

2 प्रवीण शिवाजी गायकवाडआहे  राशिवडे बुद्रुक राधनागरी दृतीय

3 अजित आत्माराम तोडकर लिंगणुर दुमाला कागल तृतीय


*घोडा*


1 असिफ अल्लाबक्ष बागवान कोल्हापूर करवीर प्रथम 

2 संदीप राजाराम देसाई कळे भामटे पन्हाळा दृतीय

3 मंदार संजय इंगवले कोल्हापूर करवीर तृतीय


*बेन्तम शेळी*


1 इनाभुन समाधान कागल प्रथम क्रमांक

2 अबुजर समाधान कागल दृतीय

3 खादीजा समाधान कागल तृतीय 


*बेन्तम बोकड*

1 इनाभुन समाधान कागल प्रथम क्रमांक

2 अबुजर समाधान कागल दृतीय

3 खादीजा समाधान कागल तृतीय 




*ऊसपिक स्पर्धा निकाल*


 *तानाजी लहू मोरे कोगे प्रथम क्रमांक*



*फळे*


१) प्रथम प्रताप रगुनाथ चिपळूणकर नागदेववाडी(केळी)


 २) श्री महादेव शामरावं पाटील तिटवे ( चिकू)


 ३) श्री. पुंडलिक कृष्णा डाफळे  हाबरवाडी (पपई)


*भाजीपाला*


१) प्रशांत नागेंद्र घाटगे चिंचवाड( चायना कोबी)


  २) प्रकाश बालगोंडा पशिल विनोर बाळासो  भंडारी नरंदे (आले)


३) प्रकाश बाबगोंदा पाटील हरोली

 (फुलकोबी)


*फुलशेती*


१)  संजय श्रीपती तापेकर रशिवडे बुद्रुक (जरबेरा)


 २) सुभाष मलगोडा पाटील भडगाव (ऑर्किड)


 ३)श्री. संजय नरसू लठे   नांदनी (जीपसोफिला) 


*कृषी प्रक्रिया*


१) शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग (नाचणी बिस्किटे,पापड,पीठ)


२) सह्याद्री फुड्स (गूळ) वंदुर 


३) वसंत मारुती फराकटे कसबा वाळवे

(गूळ काकवी)




देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, डी.वाय. पाटील ग्रुप,संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बि-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत, आदींसह टिमचा व डॉ.सुनील काटकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी समारोप प्रसंगी प्रास्ताविक व सूत्र संचालन सतीश बर्गे यांनी नेटक्या पद्धतीने केले.



सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात चार दिवसात विक्री झालेला शेतमाल : 

1) सेंद्रीय गूळ : 3800kg

2) इंद्रायणी तांदूळ : 6400kg 

3) आजरा घनसाळ  13000kg 

4) सेंद्रीय हळद : 1600 kg 

6) नाचणी :  1650kg

7) विविध बी.बियाणे 800 च्या आसपास kg

Comments