बुद्धिबळ स्पर्धेत शर्वरी कबनुरकर आणि विवान सोनी अजिंक्य

 बुद्धिबळ स्पर्धेत शर्वरी कबनुरकर आणि विवान सोनी अजिंक्य   



 कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क 

उदयपूर राजस्थान येथे 21ते 23 डिसेंबर 2024अखेर झालेल्या 1800 फिडे रेटिंग  बुद्धिबळ स्पर्धेत 331 खेळाडूनी भाग घेतला त्यामधे 226 रेटिंग धारक खेळाडूनी खेळायला होते. 

शर्वरी कबनुरकर 


महिलांच्या मध्ये शर्वरी कबरनूरने 9 फेरीमध्ये 6 गुण मिळवले गटात प्रथम क्रमांक मिळवला तिला बारा हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. ती के आय टी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज येथे पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे तिला कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .

विवान सोनी


विवान सोनी हा इचलकरंजीतील  पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये चौथीच्या वर्गात शिकत आहे त्याने 7 गुण मिळवून अकरा वर्षाखालील गटात अजिंक्यपद मिळवले त्याला दहा हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले.  विवान ला इचलकरंजीतील त्याच्या  शाळेचे मुख्याध्यापक  आणि क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Comments