AI चा वापर करा, पण गुलाम बनू नका - मुकेश अंबानी

 AI चा वापर करा, पण गुलाम बनू नका - मुकेश अंबानी




या शतकाच्या अखेरीस भारत बनेल जगातील सर्वात समृद्ध राष्ट्र - मुकेश अंबानी

• दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते अंबानी

मुंबई २९ सिटी न्यूज नेटवर्क 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चर्चेत आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचाही सहभाग झाला आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत म्हणाले, “ChatGPT चा नक्कीच वापर करा, पण लक्षात ठेवा की आपण आर्टिफिशियल बुद्धीने नव्हे, तर आपल्या स्वतःच्या बुद्धीनेच पुढे जाऊ शकतो आणि प्रगती करू शकतो.” ते पंडित दीनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटी (PDEU) च्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.


विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, “मी आपल्या तरुण विद्यार्थ्यांना एक सल्ला द्यायचा आहे. तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक साधन म्हणून वापर करण्यात निष्णात व्हा, पण स्वतःची बुद्धी वापरणे कधीही थांबवू नका. या विद्यापीठाच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला आणखी मोठ्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ’ मध्ये प्रवेश घ्यावा लागेल. जिथे ना कॅम्पस असेल, ना क्लासरूम, ना शिकवणारे शिक्षक. तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावरच पुढे जावे लागेल.”


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना मुकेश अंबानी म्हणाले, “पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच झाली आहे. वीस वर्षांपूर्वी त्यांनी मला सांगितले होते की गुजरातने ऊर्जा आणि ऊर्जा उत्पादनांच्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करावे. तसेच, जागतिक दर्जाचे मानवी संसाधन विकसित करण्यामध्येही गुजरात अग्रणी असावे. आणि अशा प्रकारे या अग्रगण्य विद्यापीठाची स्थापना झाली.” लक्षात घ्या की मुकेश अंबानी हे PDEU चे संस्थापक अध्यक्ष आणि चेअरमन आहेत.


दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी यांनी ठामपणे सांगितले की, “मी स्पष्टपणे पाहू शकतो की या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात समृद्ध राष्ट्र बनेल. जगातील कोणतीही ताकद भारताच्या प्रगतीचा वेग रोखू शकत नाही.”

Comments