दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

गुरुवार, ३० जानेवारी २०२५. 







माघ शुक्ल प्रतिपदा. शिशिर ऋतू. क्रोधी नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


चंद्र नक्षत्र - श्रवण/धनिष्ठा.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर/ (संध्याकाळी ६.३६ नंतर) कुंभ. (व्यतिपात योग शांती)


"आज संध्याकाळी ७.०० नन्तर चांगला दिवस आहे." 


मेष:- चंद्राचा हर्षलशी केंद्रयोग् आहे. सूर्याचा गुरुशी त्रिकोण शुभ योग आहे. नोकरीत चांगले अनुभव येतात. वरिष्ठ मदत करतील. उत्तरार्ध अधिक चांगला आहे.

     

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. भेटी गाठी होतील. जुने मित्र भेटतील. मन आनंदी राहील. 

 

मिथुन:- उच्च दर्जाचे आध्यत्मिक लाभ होतील. खर्च वाढतील. विशेष निमित्त साधून नवीन वाटचाल सुरू कराल. 


कर्क:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. या कालावधीत महत्वची कामे पूर्ण करून घ्या. बुद्धीचा योग्य वापर कराल. प्रगती साधाल.

   

सिंह:- आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मोठी झेप घ्याल. व्यवसाय वाढेल. पूर्वार्ध अनुकूल आहे.   

  

कन्या:- संतती कडून चांगली बातमी समजेल. शिक्षणात यश मिळेल. छोटी सहल घडेल. अधिकार वाढतील.

 

तुळ:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नातेवाईक येतील. प्रवास घडतील. घरगुती समारंभ घडेल.    

 

वृश्चिक:-  उत्तम व्यावसायिक यश लाभेल. भावंड भेटतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. पत्नीची साथ लाभेल.


धनु:-  अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळी आणि नात्यातून सहकार्य मिळेल. उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे.  मन प्रसन्न राहील. 

 

मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल.  

 

कुंभ:- दिवस फारसा आशादायक नाही. साचलेली कामे पूर्ण करा. खर्च वाढतील. संध्याकाळ मात्र सुखद आणि आनंद देणारी आहे.    

 

मीन:- उत्तम दिवस आहे. प्रगती साध्य कराल. आरोग्य सुधारेल. स्वप्ने साकार होतील. संध्याकाळ खर्च वाढवणारी असेल.  


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments