"श्री व्हिजन" प्रोडक्शन निर्मित 'वहिवाट' ०७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
'श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित 'वहिवाट' हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारी 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक डॉ. संजय तोडकर यानी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एका छोट्याशा आदिवासी पाड्यावर घडणाऱ्या घटनातून संपूर्ण विश्वाशी निगडित असणारा विषय कुशलतेने हाताळलाय.
आजच्या काळात "विकास" म्हटलं की "पर्यावरणाचा ऱ्हास" हे गृहीत धरायचं. प्रगतीच्या वाटेवर चाललोय असे समजून आपण खरं तर विनाशाकडे चाललोय... पण एक समाज म्हणून त्याची जाणीव आपल्याला अजिबात नाही. ती व्हायला हवी... हा चित्रपट ती जाणीव करून देतो.
चित्रपटात राज वरक, प्रणवी पाटील, रुकैया शिलेदार, एन डी कार्वेकर, तनुजा कदम, अमृत सावंत, भक्ती गोमई, संजय टिपुगडे व राज पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा व संवाद कै. विजय शंकर पवार यांचे असून पटकथा लेखन पल्लवी अशोक जोशी यानी केले आहे. चित्रपटाचे देखणे छायांकन जयदीप निगवेकर, संगीत - पार्श्वसंगीत चंद्रशेखर जनवाडे व रवींद्र चांदेकर यांनी तर कार्यकारी निर्माता म्हणून खुदाबक्ष जमादार व पल्लवी तोडकर यानी काम पाहिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे वितरक कुमार गावडा हे असून, "झी म्युझिक मराठी" या आघाडीच्या म्युझिक चॅनल वरून या चित्रपटाचे संगीत संपूर्ण जगभरात प्रदर्शित होत आहे.
Comments
Post a Comment